‘खडसे सिर्फ झांकी है, बहुत कुछ बाकी है’; मुश्रीफ यांचा सूचक इशारा
सातारा : “चांगला कारभार करा, नांदा सौख्य भरे,” अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर दिली. तब्बल चार दशकांपासून भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. यावरुन भाजपमधून त्यांच्यावर कडाडून टीका करण्यात येत आहे. (Pravin Darekar On Eknath Khadse BJP Resign)
प्रवीण दरेकर हे आज सातारा दौऱ्यावर आहे. दरेकर यांना एकनाथ खडसेंच्या राजीनामा आणि राष्ट्रवादी प्रवेशावर विचारले असता त्यांनी खडसेंवर टीका केली.
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काहींना आकस आणि पोटशूळ आहे. ज्यांनी या राज्याचे 5 वर्ष सक्षमपणे नेतृत्व केले हे काही लोकांना पचनी पडले नाही. त्यांच्यावर कोणतेही आरोप करता येत नाहीत यासाठी त्यांची छबी बदनाम करण्यासाठी खडसेंचा गेम करत राष्ट्रवादीत घेतलं,” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी खडसेंवर केला.
“केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना तपासासाठी आता यापुढे राज्य सरकारची परवानगीबद्दल विचारले असता दरेकर म्हणाले, राज्य सरकार आणि केंद्र सरकार संघर्ष उभा करणे, हे या लोकशाहीमध्ये योग्य नाही. हा निर्णय योग्य पद्धतीचा नाही.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर आणि उस्मानाबादला आल्यावर त्यावेळेस काहीतरी घोषणा करतील असे वाटले होते. अजून दोन दिवसांत त्यांनी काहीतरी घोषणा करावी अशी अपेक्षा आहे. हा विषय आम्ही राजकीय दृष्टीतून पाहत नाही अशा वेळेत शेतकऱ्यांना एका बाजूला दीर्घकाळ उपाययोजना तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. फडणवीस सरकारच्या काळात ओला दुष्काळाच्या काळात स्वतंत्र GR काढला, असेही मत प्रवीण दरेकरांनी यावेळी व्यक्त केले. (Pravin Darekar On Eknath Khadse BJP Resign)
संबंधित बातम्या :
यंदाचा सावरगाव दसरा मेळावा ऑनलाईन, भगवान भक्तीगडावर येऊ नका,पंकजा मुंडेंचे आवाहन