मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आज आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपनं आझाद मैदानात सभा घेतली. या सभेत भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी जोरदार टीका केली. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानातील सभेनंतर भाजपनं धडक मोर्चा काढला. आझाद मैदानातून सुरु झालेला भाजपचा धडक मोर्चा मेट्रो सिनेमा इथं आल्यानंतर अडवण्यात आला. भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रविण दरेकर (Pravin Darekar), चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी मेट्रो सिनेमा येथे ताब्यात घेतलं. पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. भाजप नेत्यांनी यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांचा आमचा घातपात करण्याचा विचार होता की काय अशी शंका उपस्थित केली. जसं नाक्यावरच्या चोर आणि दरोडेखोरांना पकडतात तसं आम्हाला नेण्यात आलं, असं प्रविण दरेकर म्हणाले.
आम्हाला पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं. आम्हाला बसवून ठेऊन वरिष्टांशी चर्चा सुरु होती. आम्हाला अटक दाखवून त्यानंतर पोलिसांनी सोडून दिलं. जनतेच्या दबावाची भीती होती त्यामुळं पोलिसांना आम्हाला सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हतं, असं प्रविण दरेकर म्हणाले. पोलिसांचा घातपात करण्याचा विचार होता की काय अशी शंका आम्हाला होती. जसं नाक्यावरचे चोर दरोडेखोर यांना पकडतात तसे आम्हांला नेण्यात आलं, 5 मीटरचं अंतर पाउणतासावर गेलं. आम्हाला घेऊन जाताना मध्येच ब्रेक मारणं वैगरे असे प्रकार सुरु होते. आतमध्ये सगळे एकमेकांवर आदळत होते, असा अनुभव प्रविण दरेकर यांनी सांगितला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. प्रशासनाला मी दोष देणार नाही, ते सरकारच्या प्रेशर खाली काम करत आहेत. आता गावा गावात मोर्चे निघतील. मंत्र्यांच्या घरी जाऊ मात्र मागणीपासून मागं हटणार नाही. आम्ही हा संघर्ष अजुन तीव्र करु आणि सरकारला नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा लागेल, असं चंद्रकातं पाटील म्हणाले.
गिरीश महाजन यांनी आजच्या मोर्चानं प्रशासनाची झोप उडाली आहे. राज्यभर आजच्या आंदोलनाचे पडसाद उमटणार असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. हे आंदोलन इथेच थांबणार नाही. आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत. आम्ही चर्चा करुन पुढची दिशा ठरवू गिरीश महाजन म्हणाले. पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव आहे. अनेक ज्येष्ठ भाजपचे नेते होते. चांगली वागणूक दिली गेली नाही, असा आरोप
इतर बातम्या:
Share Market : Exit Pollचा बूस्टर, तेजीचे सलग 2 दिवस; सेन्सेक्स 1223 अंकांनी वधारला