मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपाला (BJP) अनपेक्षित असे यश मिळाले होते. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे (ShivSena) उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला तर भाजपाचे महाडिक विजयी झाले होते. याच निकालाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये पहायला मिळाली. भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) हे विजयी झाले तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना जातं. आपल्याकडे एकही मत नसताना प्रसाद लाड विजयी झाले. ही किमया फडणवीसांनी करून दाखवली. देवेंद्र फडणवीसांचा नाद करायचा नाही. त्यांनी प्रस्तापितांना लोळवण्याचे काम केले, अशी प्रतिक्रिया विजयानंतर प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमदेवार चंद्रकांत हंडोरे यांचा पभारव झाला आहे.
प्रवीण दरेकर यांनी या विजयाचे सर्व श्रेय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आमच्याकडे एकही मत नसताना आमचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले. ही किमया फडणवीसांनी करून दाखवली. त्यामुळे आता फडणवीस यांचा नाद करायचा नाही. त्यांनी प्रस्तापितांना लोळवण्याचे काम केले, अशी प्रतिक्रिया विजयानंतर प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे. पराभव झाल्यानंतर जनतेसमोर येण्यासाठी धाडस लागतं, उद्याचा सामना वाचा तुम्हाला सर्व काही कळून जाईल. ‘गिर गया तो भी टांग उपर’ अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्याचे पहायला मिळाले. पुरेसे संख्याबळ नसताना देखील भाजापाचा पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मात्र आपले दोन्ही उमेदवार निवडून आणले. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण आमदार 55 होते. अपक्ष आमदार मिळून त्यांचे संख्याबळ 64 च्या आसपास जात होते. त्यापैकी त्यांना केवळ 52 मतं पडली. शिवसेनेचे एकूण 12 मतं फुटली. तर काँग्रेसचे एकूण 44 आमदार आहे. अपक्ष मिळून त्यांचे संख्याबळ 48 एवढे होते. मात्र त्यांना 42 एवढेच मतं पडली. काँग्रेसचे सहा मतं फुटली. दुसरीकडे भाजपाला 21 मतं अधिक मिळाली. तर राष्ट्रवादीला 6 मतं अधिक मिळाली.