अमित ठाकरेंच्या एन्ट्रीने हिंदुत्व आणि मनसेला बळ : राम कदम
मी मनसेमध्ये होतो. त्यामुळे त्यांना जवळून ओळखतो. त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीने हिंदुत्व आणि मनसेला निश्चितच बळ मिळणार आहे," अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी (Ram Kadam On Amit Thackeray) दिली.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज (23 जानेवारी) गोरेगाव येथे पहिलं अधिवेशन आयोजित करण्यात आले (Ram Kadam On Amit Thackeray) होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याची अधिकृतपणे पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर अमित ठाकरेंना भाजप नेते राम कदम यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. “अमित ठाकरेंच्या एन्ट्रीने मनसेला बळ मिळेल. मी मनसेमध्ये होतो. त्यामुळे त्यांना जवळून ओळखतो. त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीने हिंदुत्व आणि मनसेला निश्चितच बळ मिळणार आहे,” अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी (Ram Kadam On Amit Thackeray) दिली.
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे भगव्या रंगाच्या झेंड्यातून शिवसेनेचं हिंदुत्व आणि शिवसैनिकांना आकर्षित करुन खिंडार पाडण्याचा प्रयत्न करत आहे,” असेही राम कदम म्हणाले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळेच आता पुन्हा एकदा देशातील आणि राज्यातल्या जनतेला हिंदुत्व दाखवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे,” असेही राम कदम (Ram Kadam On Amit Thackeray) म्हणाले.
भाजप मनसेची युती शक्य आहे का? असा प्रश्न राम कदम यांना विचारलं असतं ते म्हणाले, “मनसेने भूमिका बदलली आहे. त्यामुळे मनसेला आपल्याबरोबर यायचे की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील.”
“महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची सहा महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली आहे. आता सरकार त्यांना हटवायला निघालं आहे. या सरकारला काय झालंय. ते न्यायालयाला खोटी माहिती देतात,” असेही राम कदम (Ram Kadam On Amit Thackeray) म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी ठराव मांडून अमित ठाकरेंचं धडाक्यात लाँचिंग (MNS Amit Thackeray Launch) केलं.
‘मला ही संधी दिल्याबद्दल राजसाहेबांचे धन्यवाद. मी आज ठराव मांडणार आहे, हे काल संध्याकाळी सांगितलं, त्यामुळे पायाखालची जमीन सरकणं काय असतं, याची कल्पना आली. येत्या 2 महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील. 14 वर्षात मनसेचं पहिलंच अधिवेशन झालं. 27 वर्षात पहिल्यांदाच मी व्यासपीठावर बोलतोय. त्यामुळे हा आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे’ असं म्हणत अमित ठाकरे यांनी ठराव मांडला.
मनसेचा नवा झेंडा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले आहेत.