अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती, हे सरकार लवकरच कोसळणार : राम शिंदे
राज्यातील सरकार जनतेच्या मनातील सरकार नसल्यामुळं लवकरच कोसळेल, असं माजी मंत्री राम शिंदे म्हणाले. Ram Shinde Uddhav Thackeray
अहमदनगर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील सध्याचे हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, असं वक्तव्य माजी मंत्री राम शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. कोरोनाची आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आला. सध्या पाणी आहे तर वीज नाही, डीपी जळत आहेत, कुठलाही दूर दृष्टिकोन नसलेले सरकार असल्याचं राम शिंदे म्हणाले. (BJP leader Ram Shinde Criticize Uddhav Thackeray Government)
महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट असल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. तर, पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्य असून जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी आहे. सरकारकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. राज्य सरकार दमबाजी आणि दमदाटी करणार असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये झाली आहे. हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, अशी टीका राम शिंदे यांनी केली. (BJP leader Ram Shinde Criticize Uddhav Thackeray Government)
राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली नाही, प्रवीण दरेकरांची टीका
महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत असल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेत बदल झालेले दिसतात. मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीकडून वार, बघून घेऊ अशा प्रकारची वक्तव्य यापूर्वी कधी झाली नाहीत. मुख्यमंत्र्यांची वक्तव्य चिंताजनक आहेत. कोणाताही पक्ष छोटा असो की मोठा असो संघर्षातून तयार झालेला असतो. धमकावण्याच्या किंवा सूड घेण्याच्या मानसिकतेत असेल तर ते आता थांबवायला पाहिजे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला. मराठा आरक्षणाला हायकोर्टात टिकणारे आरक्षण दिले. सर्व समाजांना न्याय देण्याच्या भूमिका घेतल्या. मराठवाडा वॉटर ग्रीडसारखा प्रकल्प आणला. महाविकास आघाडी सरकारनं याला स्थगिती दिली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत दिली नसल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला.
भाजपनं आंदोलन केल्यानंतर दहा हजार कोटीचे पॅकेज ताहीर केले पण ते अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. कोरोना काळात इतर राज्य सरकारांनी वेगवेगळी पॅकेज दिली पण महाराष्ट्र सरकारनं दिली नाहीत. राज्य सरकारनं सर्व कामांना स्थगिती दिली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून सूडाची भाषा संयुक्तिक नाही, मित्रपक्षांच्या दबावातून ठाकरेंची हिंदुत्वाशी विसंगत भूमिका : प्रवीण दरेकर https://t.co/jzVcw5ilGU @mipravindarekar @BJP4Maharashtra @OfficeofUT @rautsanjay61 #SanjayRaut #Saamana #UddhavThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
संबंधित बातम्या
Ram Shinde | राष्ट्रवादीनं सिंचन घोटाळ्याचा साक्षीदार फोडला : राम शिंदे
खडसे सिंचन घोटाळ्यातील साक्षीदार म्हणूनच त्यांना फोडले, राम शिंदे यांचा दावा
(BJP leader Ram Shinde Criticize Uddhav Thackeray Government)