राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे
विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.(Raosaheb Danve on UP Police Pushed Rahul Gandhi)
लातूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोणीही धक्काबुक्की केली नाही. मात्र त्यांना जास्त गर्दीत फिरायची सवय नाही. त्यामुळे ते पडले. विरोधी पक्ष नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Raosaheb Danve on UP Police Pushed Rahul Gandhi)
“हाथरस प्रकरणात चौकशी सुरू आहे. जर आवश्यकता पडल्यास सीबीआय चौकशी करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. याचा गुन्हेगार कोणीही असेल त्यांना पाठीशी घातले जाणार नाही,” असेही रावसाहेब दानवे म्हणाले.
“हाथरस प्रकरणातील चौकशीत अडथळा येऊ नये म्हणून मीडियाला थांबवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी परवानगी देण्यात आली,” असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी त्यांनी जालना, उस्मानाबाद आणि लातूरचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी उस्मानाबाद आणि लातूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी विधायक कसं चांगलं आहे याबाबत सांगितले. त्यांचे निवेदन संपल्यानंतर पत्रकारांनी हाथरसमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना विचारले. त्यावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले.
त्याशिवाय दानवेंनी मराठा आरक्षणाबाबत यावेळी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण मिळावे हीच भाजपाची भूमिका आहे, राज्य सरकारने व्यवस्थित मांडणी केली नसल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली, अशी टीका राबसाहेब दानवे यांनी केली.
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी धक्काबुक्की झालीच नाही असा दावा केला होता.
“राहुल गांधींना कोणीही धक्काबुक्की केली नाही. गर्दीतून जात असताना त्यांचा तोल गेला असावा. एवढ्या मोठ्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही. अशा गर्दीत आम्हीदेखील अनेक वेळा जातो. पब्लिकचा रेटा असतो. तिथे नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी असते, त्यामुळे कदाचित अस झालं असावं.” असे वक्तव्य केलं होतं. (Raosaheb Danve on UP Police Pushed Rahul Gandhi)
संबंधित बातम्या :
राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, त्यांचा तोल गेला असावा : रावसाहेब दानवे