“त्यांच्याच माणसांनी मुलाखत घ्यायची, उत्तरही त्यांनींच द्यायचे, हा ठाकरे सरकारचा कारभार”,भाजपची टीका
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सामनासाठी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतींवरुन टीका केली. Uddhav Thackeray Ravindra Chavan
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकरानं एक वर्ष पूर्ण केल्यानंतर भाजपकडून ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेत राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सामनातील मुलाखतीवरुन उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. ‘सामना आणि इतर माध्यमांतून त्यांच्याच वृत्तपत्रात त्यांच्याच माणसांनी मुलाखती घ्यायच्या.त्यांचे त्यांनीच प्रश्न विचारायचे,त्यांनीच उत्तरे द्यायची.स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून पाठ थोपटून घ्यायची. हा अशा प्रकारचा ठाकरे सरकारचा एक वर्षाचा कारभार आहे, असा टोला माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी लगावला आहे. (BJP leader Ravindra Chavan criticize Uddhav Thackray Government)
‘मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह करायचे, त्यात त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फार छान अशा कमेंट्स करायच्या.आणि हे लोकांपर्यंत न्यायचं.अशा पद्धतीचा कारभार या एक वर्षात या सरकारने केला आहे, असा उपरोधिक टोला ही चव्हाण यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या एक वर्षपूर्तीबद्दल भाजपकडून राज्यात पत्रकार परिषदा घेऊन सरकारचा लेखाजोखा मांडला गेला.कणकवली मध्ये रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या निमित्ताने सरकारवर निशाणा साधला, यावेळी भाजप आमदार नितेश राणे उपस्थित होते. (BJP leader Ravindra Chavan criticize Uddhav Thackray Government)
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे
“इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. हे मार्ग अवलंबल्याने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल. मात्र, मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही. खासदार उदयनराजे यांच्याप्रमाणे मीही सांगतो. लवकरात लवकर तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले तर तीन महिन्यात आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असं आमदार नितेश राणे म्हणाले. तसेच,
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी ठाकरे सरकारला मराठा समाजाला अरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं तर तीन महिन्यांत आम्ही मराठा समजाला टिकेल असं आरक्षण देऊ असा दावा केला. तसेच, हे चोरांचं सरकार आहे. महाविकास आघाडीला मराठा समाजाला त्रास द्यायचा आहे असे म्हणत प्रामाणिकपणे आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट असल्याचंही ते म्हणाले.
फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावाhttps://t.co/obQRTC97D7@NiteshNRane #bjp #cm #maharashtragovt #maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
संबंधित बातम्या :
फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा
‘मुख्यमंत्र्यांची भाषा उर्मट, पदाला साजेसं वक्तव्य करावं’, निरंजन डावखरेंचा हल्लाबोल
(BJP leader Ravindra Chavan criticize Uddhav Thackray Government)