Sonali Phogat: भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 41 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे., वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
पणजी: भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे., वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सोनाली या अभिनयविश्वात काम करत होत्या आणि त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. टिक टॉकवर त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. दररोज त्या टिक टॉकवर अनेक नव-नवे व्हिडीओ बनवून पोस्ट करायच्या. त्यांना टिकटॉक स्टार (Tiktok Star Sonali Phogat) म्हणूनही ओळखलं जायचं. बिग बॉसच्या 14 व्या पर्वातही त्यांनी हजेरी लावली होती. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आदमपूर मतदार संघातून त्यांनी हरियाणातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तिथे त्यांचा 29 हजार मतांनी पराभव झाला होता. पण त्यांचा मानणारा, त्यांचा चाहता वर्ग मोठा होता. आज त्यांना गोव्यात असताना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यांची प्राणज्योत मालवली.
भाजप नेत्या आणि प्रसिद्ध टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारासह भाजपमध्ये आणि त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये शोकाकूल वातावरण आहे.
View this post on Instagram
सोनाली फोगाट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद इथं झाला. त्यांनी 2006 मध्ये हिस्सार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली होती. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. सोनाली यांचं लग्न बहिणीच्या दिराशी झालं होतं. त्यांना यशोदारा फोगाट ही मुलगी आहे. 2016 मध्ये सोनाली यांचा पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यावेळी सोनाली मुंबईत होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी वसतिगृहात राहते.
शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट
सोनाली सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह होत्या. त्या विविध फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत होत्या. काल संध्याकाळी त्यांनी एक व्हीडिओ पोस्ट केला होता. रुख से जरा नकाब हटा दो, मेरे हुजुर या गाण्यावरचा व्हीडिओ त्यांनी शेअर केला होता. त्याला अनेकांनी पसंती दिली होती. त्यांचं असं अचानकपणे जाणं त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.
View this post on Instagram