फडणवीस, जास्त बोलाल तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीतच, महाराष्ट्रात येऊन भाजप नेत्यानं सुनावलं…

कुणीही आड आलं तर पंढरपूरचं कॉरिडोअर होणारच, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. यालाच सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिलंय.

फडणवीस, जास्त बोलाल तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीतच, महाराष्ट्रात येऊन भाजप नेत्यानं सुनावलं...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 2:25 PM

पंढरपूरः महाराष्ट्रात येऊन खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना ओपन चॅलेंज देण्यात आलंय. त्याही पुढे जाऊन, देवेंद्र फडणवीसजी, जास्त बोलाल तर तुम्ही उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, असा इशारा भाजप नेत्यानेच दिला आहे. पंढरपूरमधील (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्यावर चर्चेसाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (subramanyam Swami) आज पंढरपूरमध्ये आले होते. पंढरपूर कॉरिडोर प्रकल्पावर बोलताना त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

पंढरपूर विकास आराखड्याला येथील स्थानिकांनी विरोध केला आहे. यावरून नागरिकांनी मुंबईत येऊन माझी भेट घेतली आणि सदर विषयात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती, अशी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली. भाजपात असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात खळबळजनक बोलणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आज पंढरपुरातही अनेक बेधडक वक्तव्य केली.

 कुणीही आड आलं तर पंढरपूरचं कॉरिडोअर होणारच, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. यालाच सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिलंय. यावर बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, मी म्हणतोय, हा विकास प्रकल्प होणार नाही. फडणवीस जास्त बोलतील तर ते उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. एवढी घाई कशासाठी आहे…

विकास करायचाच असेल तर इथली चंद्रभागा नदी शुद्ध करा, इथे विमानतळ बांधा, एवढे लोक मंदिरात दर्शनासाठी येतात. मंदिर परिसराचा विकास करा.. या कॉरिडोरवरून कुणा-कुणाला नोटीसा पाठवणं हे चालणार नाही, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलाय.

पंढरपूर मंदिर सरकार मुक्त करण्याचा आग्रह

भाजपाचे मोदी सरकार देशातील मंदिरं स्वतःच्या अधिपत्याखाली घेत आहे, असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. उत्तराखंडमधील अनेक मंदिरांचं सरकारीकरण झालं आहे. पंढरपूर मंदिर सरकार मुक्त करण्यासाठी जानेवारीत जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशातील 15-20 साधूंच्या ताब्यात इथली मंदिर द्या, अशी अजब मागणीही माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

मोदी हिंदुत्ववादी नाहीत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी नाहीत. असे धक्कादायक विधान भाजपचे माजी खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का?

1947 नंतर चर्च मशीद ताब्यात घेतली नाही. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे. मोदी हिंदुत्ववादी नाही. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरे सरकारीकरण केले. न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार . मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार, पंतप्रधान मोदी तसे नाहीत. 370 कलम हटवण्यासाठी मी अमित शहा यांना मार्गदर्शन केल्याचं वक्तव्यही सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.