महाराष्ट्राची वाट लावणारी नव्या सरकारची वाटचाल : सुधीर मुनगंटीवार

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले.

महाराष्ट्राची वाट लावणारी नव्या सरकारची वाटचाल : सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Dec 10, 2019 | 6:16 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. या महाविकासआघाडी सरकारच्या कामावर माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantivar criticized on shivsena government) यांनी बोचरी टीका केली आहे.

“नव्या सरकारची वाटचाल ही महाराष्ट्राची वाट लावणारी आहे. महाविकासआघाडी दीर्घकाळ सत्ता चालवण्यासाठी अस्तित्वात आलेली नाही. जनादेशाच्या बाहेर जाऊन सरकार जन्माला येते ते दीर्घकाळ टिकत नाही”, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantivar criticized on shivsena government) यांनी सांगितले.

“शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची विचारधारा पूर्ण भिन्न आहे. एका पक्षाला मुख्यमंत्रिपद पाहिजे होते, तर बाकी दोन पक्षांना भाजपला दूर ठेवायचे होते म्हणून यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. जनादेशाच्या बाहेर जाऊन सरकार जन्माला येते ते दीर्घ काळ टिकत नाही. कर्नाटकमध्ये आपण पाहिलेच असेल”, असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.

एकनाथ खडसे आमचे नेते

दरम्यान, सुधीर मनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली. “एकनाथ खडसे हे आमचे नेते आहेत. खडसेंच्या नेतृत्वात मी काम केले आहे. आपल्या आयुष्यातील परिवाराचा वेळ त्यांनी पक्ष वाढीला दिला. त्यांची नाराजी असेल तर ती दूर होईल आणि चांगलं घडेल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ खडसेंना घेण्यास आग्रही आहेत पण ते तिथे जाणार नाहीत”, असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांचा एक गट नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंसारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद वाढला असल्याचे सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.