मुख्यमंत्र्यांची ‘मी जबाबदार’ घोषणा पण वाढत्या कोरोनाला जबाबदार कोण?: सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी कोरोना, आरोग्य सुविधा, नोकरभरती, संजय राठोड प्रकरणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्र्यांची 'मी जबाबदार' घोषणा पण वाढत्या कोरोनाला जबाबदार कोण?: सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 6:27 PM

मुंबई: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी कोरोना, आरोग्य सुविधा, नोकरभरती, संजय राठोड प्रकरणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री वाढत्या कोरोनावर चिंता व्यक्त करत मी जबाबदार ही नवी घोषणा केली पण  वाढत्या कोरोनाला कोण जबाबदार, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. सामान्य जनता जबाबदारीने वागत असते. मंत्री मोर्चे काढतात, वाढदिवस साजरे करतात. (BJP leader Sudhir Mungantiwar slams MVA Government over various issues)

विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली पाहिजे. कोरोनाशी लढण्याचा ठोस कार्यक्रम आखला पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. कोरोना सारखं संकट असूनही राज्य सरकारनं आरोग्य खात्याचं बजेट वाढवलं नाही. राज्य सरकारनं 4 मे रोजी आरोग्य खात्यात नोकरभरती करण्यास परवानगी दिली. पण, त्यांनी तेव्हापासून काहीच पावलं उचलली नाहीत. हे सरकार मे 2020 पासून नोकरभरती करु शकलं नाही, असा आरोप देखील मुनगंटीवारांनी केला.

आरोग्य सुविधांवर काम करण्याची गरज

सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व आरोग्य सुविधा संदर्भात तातडीने आणि नव्यानं आखणी करण्याची आवश्यकता आहे, असं म्हटले. सरकारने आता लेखानुदान मांडावे आणि त्यानंतर बजेट जुलैमध्ये अधिवेशनात मांडावे, असं ते म्हणाले.

संजय राठोड प्रकरणावरुन टीका

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी संजय राठोड प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका केली. राज्यात सुरु असलेली ही नवीन परंपरा योग्य नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासात काय निष्पन्न झाले ते पोलिसांनी सांगितले पाहिजे, असंही मुनगंटीवार म्हणाले. ज्यांच्यावर आरोप आहेत तर ते स्वतः बद्दल कसे काय सांगू शकतात, असा सवाल देखील, मुनगंटीवार यांनी केला.

पूजा चव्हाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांचा पोलिसांवर निशाणा

चित्रा वाघ यांनी थेट पोलिसांना लक्ष्य केले आहे. पुणे पोलीस पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास नीट करत नाहीयेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच जर राज्यातील मंत्र्यांकडे संजय राठोड यांचा पत्ता असेल तर तो त्यांनी पोलिसांना द्यावा असेही, आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार

(BJP leader Sudhir Mungantiwar slams MVA Government over various issues)

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.