Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 आमदारांचा विषय हायकोर्टात, खुर्ची प्रेम सोडा; सुधीर मुनगंटीवारांचा संजय राऊतांना चिमटा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केले आहे. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या यादीला मंजुरी देत महाराष्ट्राला गोड भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.

12 आमदारांचा विषय हायकोर्टात, खुर्ची प्रेम सोडा; सुधीर मुनगंटीवारांचा संजय राऊतांना चिमटा
सुधीर मुनगंटीवार संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 7:55 PM

चंद्रपूर: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केले आहे. विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या यादीला मंजुरी देत महाराष्ट्राला गोड भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. संजय राऊत यांच्या ट्विटवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील इतर महत्त्वाचे प्रश्न सोडून प्रत्येक वेळेस 12 आमदार विषय अजेंड्यावर आणणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. हे नियुक्ती प्रकरण उच्च न्यायालयात असताना असे खुर्ची प्रेम सोडण्याचा चिमटा मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना घेतला. (BJP leader Sudhir Mungantiwar take jibe of Sanjay Raut over tweet wishing to Governor of Maharashtra)

राज्यपालांसोबतची कटुता संपवणे स्वागतार्ह

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांच्याविषयी कटुता संपवणे स्वागतार्ह विषय असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नोंदविली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भेटीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्य प्रमुखांनी राज्यपालांना विविध विषयात मदत करणे अपेक्षित आहे. मात्र मागील काळात अनेक कटू विषय झाले. आता ते मागे पडून नवे वातावरण तयार होत असेल, अशी आशा त्यांनी बोलून दाखविली.

शिवसेनेनं राष्ट्रवादीचं काय एमआयएमसोबतही जावं

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सामनातील लेखावर दिली आहे. शिवसेनेने कुणासोबतही जावं एमआयएम सोबतही जावं आमची काहीही हरकत नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. दोन पक्षांनी विलीन होत शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढावा असाही टोला त्यांनी लगावला. मात्र राज्यात जनहिताचे निर्णय न घेणारे सरकार टिकू शकणार नसल्याचे मत मात्र त्यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांचं ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा काही वेगळ्याच म्हणाव्या लागतील. कारण, संजय राऊत यांनी राज्यपालांना शुभेच्छा देताना विधान परिषदेच्या 12 आमदारांची रखडलेली नियुक्ती करुन महाराष्ट्राला गोड भेट देण्याचं आवाहन केलंय.

12 आमदारांची यादी 7 महिन्यांपासून राज्यपालांकडेच

ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर 15 जून रोजी सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं त्यांना कळवण्यात आलं. तर दुसरीकडे 12 आमदार यांच्या नियुक्तीबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 12 आमदारांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, 25 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या:

एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या पदरी मृत्यू, हीच का उपकाराची परतफेड? राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

‘होय… शिवसेना गुंडगिरी करते, शिवसेना भवनावर आंदोलन करायचं नाही’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा

(BJP leader Sudhir Mungantiwar take jibe of Sanjay Raut over tweet wishing to Governor of Maharashtra)

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.