भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटणार, मुनगंटीवार ते केसरकर महायुतीचं सरकार : सुधीर मुनगंटीवार

भाजप नेते उद्या राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली. भाजपची कोअर कमिटीची आज बैठक पार पडली.

भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटणार, मुनगंटीवार ते केसरकर महायुतीचं सरकार : सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Nov 06, 2019 | 5:29 PM

मुंबई :  भाजप नेते उद्या राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (BJP leader to meet governor ) यांनी याबाबतची माहिती दिली. भाजपची कोअर कमिटीची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुनगंटीवारांनी (BJP leader to meet governor ) माध्यमांशी संवाद साधला.

मुनगंटीवार म्हणाले, “महाराष्ट्राचा जनादेश महायुतीला आहे, उद्या राज्यपालांना भेटायला जातोय, महायुतीचंच सरकार स्थापन होईल. चंद्रकात पाटील आणि मी उद्या राज्यपालांना भेटणार आहोत. आम्ही पहिल्या दिवसापासून महायुतीचाच विचार करत आहे. महायुतीशिवाय कोणताही अन्य विषयाला शिवलं नाही. सरकार आमचचं येईल यात कसलीही शंका नाही. चांदा ते बांदा आणि मुनगंटीवार ते केसरकर या सगळ्यांनी महायुतीत निवडणूक लढवली आहे. प्रत्येक पाऊल हे महायुतीच सरकार व्हावं यासाठीच पुढेच जातय”

“राज्यात शिवसेना-भाजप सरकार व्हावं यासाठी जनादेश मिळाला आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार आणण्यासाठी आमचं प्रत्येक पाऊल पुढे पडेल. यासाठी मी आणि चंद्रकांत पाटील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहोत. त्यावेळी कोणत्या गोष्टीबाबत चर्चा होईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार येईल त्यामुळे चिंता करु नका,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“तुम्हाला कोणत्याही क्षणी गोड बातमी तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे चिंता करु नका. सरकार फक्त महायुतीचे येणार आहे. कोणीही कितीही विचार केला. कोणी कितीही चिंता केली तरी सरकार महायुतीचे येईल. राज्यपालांना भेटल्यानंतर महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय हे सर्व स्पष्टीकरण मी त्यावेळी देईन,” असेही ते म्हणाले.

“येत्या 31 डिसेंबरपर्यंत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात येईल. 31 डिसेंबरला चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत संपत आहे. त्यामुळे त्यानंतर त्यांची निवड होईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.”

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 14 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत (Mahrashtra Winner MLA  Oath Ceremony Date) आहे.

भाजपला 12 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 117 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.