भाजप नेते उदय वाघ यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ (Uday Wagh passed away) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.
जळगाव : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ (Uday Wagh passed away) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. उदय वाघ (Uday Wagh passed away) हे भाजपाचे आमदार स्मिता वाघ यांचे पती आहेत. उदय वाघ यांच्या निधनाने राजकीय वर्तुळाला धक्का बसला आहे. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
उदय वाघ हे जळगाव जिल्ह्यातील भाजपचं मोठं नाव आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उदय वाघ यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी ही उमेदवारी बदलून आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. काही दिवसांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर असताना, त्यांना डावलून त्यांच्या जागी भाजपने 3 एप्रिलला उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली होती.
त्यामुळे गिरीश महाजन यांच्यासमोर जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये भाजपच्या सभेत तुफान राडा झाला होता. भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बीएस पाटील यांना व्यासपीठावरच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. विशेष म्हणजे बाजूलाच असलेल्या गिरीश महाजनांनाही या गोंधळात धक्काबुक्की झाली.
उदय वाघ यांचा परिचय
- उदय वाघ हे भाजपचे खंदे समर्थक होते.
- त्यांच्या पत्नी स्मिता वाघ या भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत
- उदय वाघ यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे
- उदय वाघ हे भाजपचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष होते