माढ्यातून बंडखोरीचा इशारा, उत्तम जानकरांकडून भाजपविरोधात दबावतंत्र?

पंढरपूर : भाजपने माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. पण भाजपमध्ये असणारे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी उद्या दुपारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपवर दबाव टाकून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचंही […]

माढ्यातून बंडखोरीचा इशारा, उत्तम जानकरांकडून भाजपविरोधात दबावतंत्र?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

पंढरपूर : भाजपने माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. पण भाजपमध्ये असणारे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी उद्या दुपारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपवर दबाव टाकून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय.

माढा लोकसभा मतदारसंघातून अनेक चर्चा आणि सल्ला-मसलत नंतर भाजपकडून फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली. निंबाळकर यांच्या समविचारी आघाडीत असणारे भाजपचे धनगर नेते उत्तम जानकर यांना आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र राजकीयदृष्ट्या निवडून येण्याची क्षमता म्हणून निंबाळकर उमेदवार ठरले.

माढा लोकसभा मतदारसंघात चार लाख धनगर समाज आहे आणि याच धनगर समाजाचे मतदान आपल्याला पडेल अशी आशा जानकर यांना आहे. जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज देखील घेतला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी वेळापूर येथे जानकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जो निर्णय असेल तो मान्य करत आपण निवडणुकीच्या रिंगणात असो की नसो हे उद्याच कळेल असे जानकर यांनी सांगितले. मात्र जानकर यांची ही भूमिका म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय.

व्हिडीओ पाहा :

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.