BJP Leader’s Sleeping : भाजप नेते भर प्रचारसभेत ढाराढूर, नुसत्या जांभया अन् डुलक्या
औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रचार सभा सुरू होती. मात्र बावनकुळेंच्या प्रचारसभेतील भाषणा इतकीच चर्चा होतेय ती काही भाजप नेत्यांचीच…कारणही तसेच आहे. चंद्रशेखर बानवकुळे हे भाषण करत असताना भाजपच्या मंत्र्यांपासून ते पदाधिकारी व्यासपीठावर भर प्रचारसभेत ढाराढूर असल्याचे पाहायला मिळाले. अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला असून भाजपच्याच प्रचारसभेत भाजप नेत्यांना झोप आवरेना… भाजप […]
औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रचार सभा सुरू होती. मात्र बावनकुळेंच्या प्रचारसभेतील भाषणा इतकीच चर्चा होतेय ती काही भाजप नेत्यांचीच…कारणही तसेच आहे. चंद्रशेखर बानवकुळे हे भाषण करत असताना भाजपच्या मंत्र्यांपासून ते पदाधिकारी व्यासपीठावर भर प्रचारसभेत ढाराढूर असल्याचे पाहायला मिळाले.
अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला असून भाजपच्याच प्रचारसभेत भाजप नेत्यांना झोप आवरेना… भाजप नेते भर प्रचारसभेत ढाराढूर दिसले आणि त्यांना नुसत्या जांभया अन् डुलक्या लागत असल्याचेही पाहायला मिळाले.
चंद्रशेखर बावनकुळे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजप शिक्षक परिषद उमेदवार प्रा. किरण पाटील यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरेंसह अनेक खासदार पदाधिकारी उपस्थित होते.