Jayant Patil : भाजपचे नेते येतील अन् बारामतीचा विकास पाहून परतेल..! पाटलांचा ‘भाजप 400 मिशन’ वर खोचक टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वेगवेगळ्या निर्णयाचा धडाका सुरु आहे. यामधील काही निर्णय हे जनतेच्या हिताचेही आहेत. यामुळे विकास कामे देखील मार्गी लागतील. पण चुकीचे निर्णय घेतले तर मात्र, सुट्टी नाही. लागलीच त्यावर ऑब्जेक्शन घेतले जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
कोल्हापूर : आगामी (Lok Sabha elections) लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने (BJP Party) भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. अद्यापही निवडणूकांना विलंब असला तरी कोणतीही कसर राहू नये असे नियोजन केले जात आहे. त्याच अनुशंगाने भाजपाचे मंत्री हा राज्यातील विविध मतदारसंघात दाखल होणार आहेत. बारामती मतदार संघात अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या येणार आहेत. यावर (Jayant Patil) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. भाजपाचे नेते येतील आणि बारामतीचा विकास पाहून परतेल असा टोला लगावला आहे. शिवाय बारामती मतदार संघावर या भाजपच्या 400 मिशनचा कोणताही परिणाम होणार नाही असेच त्यांना सूचित करायचे होते.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा धडाका, पण चुक झाल्यास..!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वेगवेगळ्या निर्णयाचा धडाका सुरु आहे. यामधील काही निर्णय हे जनतेच्या हिताचेही आहेत. यामुळे विकास कामे देखील मार्गी लागतील. पण चुकीचे निर्णय घेतले तर मात्र, सुट्टी नाही. लागलीच त्यावर ऑब्जेक्शन घेतले जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. पण सध्या जो मुख्यमंत्र्यांचा काम करण्याचा ओघ आहे त्याचेही त्यांनी कौतुक केले आहे.
निवडणुकांच्या तोंडावर असे होणारच…
राज्यात सध्या भाजप आणि मनसे युतीचा विषय चर्चेत आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने या युतीवर खोचक टीका केली आहे. निवडणुकांजवळ आल्या की कुणाचा वापर करुन घ्यावयाचे हे भाजपाला चांगले माहित आहे. त्यामुळे महापालिकेच्या तोंडावर त्यांनी मनसेशी जवळीक साधली आहे. अशावेळी आपल्याला मित्र मिळावा ही प्रत्येकाची भावना असते असे म्हणत जयंत पाटील यांनी युतीबाबतच्या चर्चेचा समाचार घेतला आहे.
संख्याबळ वाढवण्यासाठी खटाटोप
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. पण ते कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. त्यामुळे असा विचार करणार नाहीत. पण भाजपाला आणखी आपले संख्याबळ वाढवण्यासाठीची ही खटाटोप आहे का असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अमित शाह यांचा दौरा गणेश दर्शनासाठी
देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. ते लालबागच्या दर्शनासाठी येतात पण यंदा या दौऱ्यात राजकीय चर्चाही होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. पण ते दरवर्षीप्रमाणे दर्शनासाठी येणार असतील. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा होईल असे वाटत नसल्याचे पाटलांनी सांगितले आहे.