भाजपकडून सत्तास्थापनेसाठी मुदतवाढीची चाचपणी, सत्तानाट्य लांबणार?

भाजपकडून सत्तास्थापनेसाठी मुदतवाढ मिळेल का याची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्य आणखी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली (Maharashtra government formation crisis) आहे.

भाजपकडून सत्तास्थापनेसाठी मुदतवाढीची चाचपणी, सत्तानाट्य लांबणार?
Follow us
| Updated on: Nov 07, 2019 | 11:45 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 15 दिवस उलटून गेले आहेत. तरीही भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष अद्याप कायम (Maharashtra government formation crisis) आहे. मोठा पक्ष असूनही पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. यानंतर आता भाजपकडून सत्तास्थापनेसाठी मुदतवाढ मिळेल का याची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्य आणखी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली (Maharashtra government formation crisis) आहे.

भाजपकडून सत्तास्थापनेसाठी मुदतवाढ मिळते का याची चाचपणी सुरु करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे नेते अनेकांशी चर्चा करुन अशाप्रकारे मुदतवाढ मिळते का? याबाबतची चाचपणी करत असल्याचे बोललं जात आहे.

सध्या महाराष्ट्रात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप स्वत: च्या बळावर सत्तास्थापन करु शकत नाही. यामुळेच सत्तास्थापनेसाठी मुदतवाढ मिळू शकते का? याची चाचपणी भाजप नेत्यांनी सुरु केली आहे.

जर ही मुदतवाढ मिळाली तर सत्तास्थापनेसाठी भाजपला आणखी काही दिवस मिळू शकतात. त्यानंतर भाजप शिवसेनेशी किंवा इतर कोणाशी बोलून संख्याबळाची किंवा बहुमताचा आकड्याची जमवाजमव करु शकते. यासाठी भाजपने ही चाचपणी सुरु केली आहे. जर भाजपला ही मुदतवाढ मिळाली तर हे सत्तानाट्य आणखी लांबू शकत, अशीही शक्यता वर्तवण्यात येत (Maharashtra government formation crisis) आहे.

भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकीकडे शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला आहे. तसेच अल्पमताचं सरकार नको असेही भाजपने राज्यपालांच्या भेटीदरम्यान सांगितले आहे.

यामुळे सध्या कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. तर दुसरीकडे दोन दिवसांनतर विधानसभेची मुदतवाढ संपत आहे. त्यामुळे जर सत्तास्थापनेसाठी मुदतवाढ मिळाली तर संख्याबळ कुठून जोडता येईल का याची चाचपणी सुरु आहे.

भाजपकडून सत्तास्थापने संदर्भातील दावा लक्षात घेता भाजप सत्ता सोडायला तयार नाही, असेही म्हटलं जातं (Maharashtra government formation crisis) आहे.

राज्यात भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे सर्वात पहिले भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले जाईल. पण सत्तास्थापनेचा दावा करताना पुरेसे संख्याबळ असणे गरजेचे आहे. पण संख्याबळ नसेल तर भाजप सत्तास्थापनेचा दावा करु शकणार नाही.

त्यामुळे पुरेसे संख्याबळ मिळवण्यासाठी भाजपचे नेते चाचपणी करत आहेत. मुदतवाढीसाठी ही सर्व चाचपणी सुरु आहे. यासाठी भाजपकडून अनेक कायदेतज्ज्ञ, दिग्गज नेते यांची मत घेण्यात येत आहे. त्यामुळे सत्तानाट्य आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे शिवसेना मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. जे काही दिवस मिळतील त्यात भाजप चाचपणी करले. त्यावर त्यांना जो प्रतिसाद मिळेल त्यावर ते सत्तास्थापनेबाबत निर्णय (Maharashtra government formation crisis) घेतील.

त्याशिवाय यादरम्यान शिवसेनेशी गोटात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शिवसेना चर्चेसाठी तयार होते का? त्यासाठी आणखी काही मध्यस्थ कामाला लागू शकतो.यासाठी भाजपकडून चाचपणी सुरु असल्याचे बोललं जात आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.