पुण्यातून गिरीश बापटांना उमेदवारी जवळपास निश्चित!
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 2 दिवसात त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बापट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुण्याचे विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता […]
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 2 दिवसात त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बापट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुण्याचे विद्यमान भाजप खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे.
भाजपने अद्याप लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत अनेक नावांवर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. भाजप आपली उमेदवार यादी कधी जाहीर करणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. मात्र बंडखोरीच्या भीतीने भाजपने हळूहळू पावलं टाकणं पसंत केलं आहे.
तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने मात्र उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील 5 तर राष्ट्रवादीने 15 नावं जाहीर केली आहेत. मात्र शिवसेना भाजपने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. टीव्ही 9 मराठीला मिळालेल्या माहितीनुसार भाजपने 7 नावं जवळपास निश्चित केली आहेत. त्याबाबत अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे.
भाजपच्या 7 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित:
- नागपूर -नितीन गडकरी
- चंद्रपूर – हंसराज अहीर
- जालना – रावसाहेब दानवे
- पुणे – गिरीश बापट
- अकोला – संजय धोत्रे
- भिवंडी – कपिल पाटील
- गडचिरोली – अशोक नेते
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.
संबंधित बातम्या
भाजपची पहिली यादी, 7 नावं फायनल
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी
वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
गडकरींविरुद्ध नाना पटोलेच लढणार, काँग्रेसकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर