26 डिसेंबरचा ‘तो’ अग्रलेख, संजय राऊतांच्या जेलचा मार्ग मोकळा करतोय…. नारायण राणेंचा इशारा काय?
कणकवलीत काल झालेल्या भाषणात नारायण राणे यांनी संजय राऊतांना इशारा दिला. ते म्हणाले, माझ्याकडे कात्रण आहे. वकिलाकडे पाठवून ठेवला आहेत.
सिंधुदुर्गः संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा तुरुंगात जाण्याचा मार्ग मी मोकळा करणार आहे. १०० दिवस जेलमध्ये जाऊन आला तर कमी वाटतायत.. मी २६ डिसेंबरचा तो अग्रलेख (Editorial) जपून ठेवलाय. मी बोललेलं विसरत नसतो. विकलांना ते पाठवून ठेवलंय, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊत यांना दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील कार्यक्रमात नारायण राणे यांनी राऊतांना इशारा दिला. त्यामुळे 26 डिसेंबरच्या त्या अग्रलेखात नेमकं काय होतं, हे धुंडाळल्या जातंय…
मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणांच्या आरोपांखाली संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. 9 नोव्हेंबर रोजी विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून त्यांची सुटका झाली. त्यानंतर राऊत यांना पुन्हा जेलमध्ये जाण्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
26 डिसेंबरचा अग्रलेख काय?
सामना या शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या वृत्तपत्रात संजय राऊत यांनी २६ डिसेंबर रोजी नारायण राणेंना इशारा दिला होता. ठग-पेंढाऱ्यांचे राज्य! या शीर्षकाखाली हा अग्रलेख प्रकाशित करण्यात आला होता. नारायण राणे यांचा अग्रलेखात स्पष्ट उल्लेख नव्हता. पण त्यात लिहिलं होतं.. सिंधुदुर्गात सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात….
या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले १०० सांगाडे पुरावे म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील. पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ढेकणासंगे हिराबी भंगला अशी त्यांची गत झालेली दिसते…
नारायण राणेंचा इशारा काय?
कणकवलीत काल झालेल्या भाषणात नारायण राणे यांनी संजय राऊतांना इशारा दिला. ते म्हणाले, माझ्याकडे कात्रण आहे. वकिलाकडे पाठवून ठेवला आहेत. वाचून विसरणारा मी नाही. दखल घेणारा आहे. वाईट स्वभाव आहे माझा…
प्रत्येक वाक्यन् वाक्य पाहतो. 26 तारखेचा राखून ठेवलाय. संजय राऊतला सोडणार नाही. मी पण केस टाकणार. मी तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करतोय…
कोकणासाठी काम करणारे जे लोकप्रतिनिधी असतील त्या चांगल्या कामाला मराठी भाषेतले चांगले शब्द वापरा.