‘मातोश्री’वरुन कुणी राज ठाकरेंना भेटायला जात नव्हतं, मात्र आता माणिकराव ठाकरेंनाही भेटतात : आशिष शेलार
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar attack on Sanjay Raut and Shiv Sena) यांनी आज पत्रकार परिषद घेत, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेवर हल्ला चढवला.
ठाकरे आणि भाजपमध्ये विसंवाद निर्माण करण्याचा राऊतांचा प्रयत्न : आशिष शेलार
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar attack on Sanjay Raut and Shiv Sena) यांनी आज पत्रकार परिषद घेत, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेवर हल्ला चढवला. “संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण वय वाढतं तशी परिपक्वता वाढावी, अशी अपेक्षा आहे”, असं म्हणत आशिष शेलार (Ashish Shelar attack on Sanjay Raut and Shiv Sena) यांनी टोला लगावला. संजय राऊतांनी मोदीजींबद्दल प्रेम व्यक्त केलं, त्यांचं प्रेम स्वार्थी की निस्वार्थी हे जनतेला माहित आहे. राजकीय स्वार्थापोटी असत्य पसरवणं महाराष्ट्राला मान्य नाही. अमित शाह आणि मोदीजी संजय राऊत यांना समजण्यासाठी अजून बराच काळ लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.
अमित शाह यांनी दिलेल्या मुलाखतीत युतीबद्दल सत्य बोलले. आम्ही एकदिलाने एक सुराने बोलतो. मात्र आमच्यात विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठाकरे आणि भाजपमध्ये विसंवाद निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र रोज दृश्य स्वरुपात रोज सकाळी पाहात आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
खऱ्या अर्थाने पाहिलं तर भाजप आणि इतर पक्षाचे नेते ‘मातोश्री’वर आदरपोटी जायचे. मात्र आज सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेचे नेते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकीसाठी जात आहेत. आधी मातोश्रीहून कुणी राज ठाकरे यांना सुद्धा भेटायला जात नव्हतं, मात्र आता माणिकराव ठाकरे यांना भेटायला सुद्धा जात आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
संजय राऊत यांची पत्रकार परिषद
‘मी पुन्हा येईन’ असं सारखं म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. राऊतांनी दररोज पत्रकार परिषद घेण्याचा सिलसिला आपल्या वाढदिवशीही कायम (Sanjay Raut Shivsena CM for 25 years) ठेवला. ‘किमान समान कार्यक्रमा’वर काम सुरु आहे. अद्याप कोणताही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. मात्र फॉर्म्युलाची चिंता कोणीही करु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत. आम्ही 24 तारखेपासून सांगत आहोत. लाख प्रयत्न करा आम्हाला थांबवण्याचा, पण शिवसेनेच्याच नेतृत्वात सत्तास्थापन होईल’ असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला.