मुदतपूर्व निवडणूक ते 30 वॉर्ड फोडण्याचे प्रयत्न, शिवसेनेचं कारस्थान, आशिष शेलारांचे 4 मोठे आरोप

आपली हार लक्षात घेता शिवसेना पळवाटा काढायच सुरू आहे, असा आरोप आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी केला. आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघात केला.

मुदतपूर्व निवडणूक ते 30 वॉर्ड फोडण्याचे प्रयत्न, शिवसेनेचं कारस्थान, आशिष शेलारांचे 4 मोठे आरोप
आशिष शेलार, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 1:55 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar ) यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवरुन (BMC Election 2022) शिवसेना (Shiv Sena ) आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मुंबई महापालिका निवडणूकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची काही खलबत आणि कटकारस्थान सुरू आहेत. भाजप यावर लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेता शिवसेना पळवाटा काढायच सुरू आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघात केला. (BJP MLA Ashish Shelar attacks Shiv Sena over BMC election 2022 CM Uddhav Thackeray Aaditya Thackeray targeted)

शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कारस्थान करण्यासाठी चार प्रयत्न केले. मात्र हे चारही प्रयत्न फसल्याचा दावा शेलार यांनी केला. सर्वात आधी शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुका मुदतपूर्व घेण्याचं कारस्थान रचलं, मात्र ते अपयशी ठरले. महापालिकेची प्रभागरचना ही भाजपला पूरक असल्याचा आरोप करत ती बदलण्याचाही प्रयत्न झाला, मात्र हा प्रयत्न फसला. तिसरा प्रयत्न म्हणजे निवडणुका दोन वर्ष पुढे ढकलण्याचा डाव आहे. तर चौथा प्रयत्न म्हणजे 30 वॅार्ड जे आजन्म शिवसेना आणि काँग्रेसला जिंकताच येणार नाहीत अशा ठिकाणी फोडाफोडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा दावा आशिष शेलार यांनी केला.

निवडणुका पुढे ढकलण्याचं कारस्थान

कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी सुरू आहेत. 2011 च्या जनगणेनुसार 2017 ची प्रभागरचना झाली, मग आता त्याच जनगणनेनुसार 2022 मध्ये प्रभागरचना का? जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदार नोंदणी करताना जास्त वेळ लागेल, असा त्यामागचा डाव आहे. होता येईल तेवढं निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

सत्ताधारी शिवसेना आणि महाभकास आघाडी मुंबई महापालिकेला दोन वर्ष मुदतवाढ देण्याचा प्रयत्न केला जातोय. 30 वॅार्ड जे आजन्म शिवसेना आणि काँग्रेसला जिंकताच येणार नाहीत अशा ठिकाणी फोडाफोडी करण्याचा प्रयत्न सुरूय. दोन वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचं कटकारस्थान आम्ही होऊ देणार नाही. उद्या जर असं काही झालं तर या काळात सगळे कॅान्ट्रॅक्टरचे कामही निवडणूक आयुक्तांनीच करावेत, असा हल्लाबोल शेलारांनी केला.

बंदूक भी तेरी

सामनामध्ये दररोज डायलॉगबाजी केली जाते. आज आम्हीही शिवसेनेला त्यांच्याच भाषेत सांगतो, “बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है”, असं शेलार म्हणाले. कोरोनाचे नियम पाळून कधीही निवडणुका घेतल्या, तर त्यासाठी भाजप तयार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

70 कोटींचा घोळ

करून दाखवलं म्हणणाऱ्यांनी 70 कोटींचा घोळ घातलाय. 70 कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही वाद्याचा आहे, मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करु नका, पळून जाऊ नका. 5 लाख मेट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे? ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा. कट कमिशनमध्ये नालेसफाईचा सुद्धा समावेश आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

सिवरेज प्लाँट 20 हजार कोटीचं टेंडर या पुढे ढकलण्याच्या निवडणुकीमागे असून असे असंख्य टेंडर आहेत. मात्र मुंबईकरांसाठी भाजपचा लढा सुरुच राहील, असं शेलार म्हणाले.

कर्तृत्व परावलंबी महाभकास आघाडी

मराठा समाजाला EWS आरक्षण मिळेल असा निर्णय महाभकास आघाडीने घेतला. ही आघाडी कर्तव्यशून आहेच, पण कर्तृत्वशून्य हा त्यांचा परिचय आहे. आता कर्तृत्व परावलंबी आहेत हे सिद्ध झालं. कारण 10 टक्के ईडब्लूएस आरक्षण दिलं, त्यात ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय? ते मोदी सरकारने दिलंय. त्यामुळे हे ठाकरे सरकार कर्तृत्वावरही परावलंबी आहे.

OBC च्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांना द्या

आमची मागणी आहे, गायकवाड कमिशनने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल सिद्ध करुन मराठा आरक्षण मिळालं. मात्र यांनी EWS आरक्षण जाहीर केलं, पण मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल, असं शेलार म्हणाले.

EWS मध्ये टाकल्यामुळे मराठा समाज आर्थिक दुर्बल नाही, अशी मांडणी ठाकरे सरकारने करु नये. OBC ना मिळणाऱ्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांना मिळाव्या यासाठी 3 हजार कोटीचं पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

शिवसेनेकडून मराठा मोर्चाची खिल्ली

शिवसेनेने भावनाशून्यपणे मराठा मोर्चाची खिल्ली उडवली. कर्तव्यशून्य होता हे गायकवाड आयोगाची बाजू मांडली नाही यावरुन सिद्ध झालं. सर्वोच्च न्यायालायने आरक्षण स्थगिती नाकारली, त्या गायकवाड आयोगाला तुम्ही गाळात टाकलंत. आता मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणमध्ये टाकलं असलं तरी सामाजिक मागासलेपण गाळू नका, असं आवाहन मविआला करतोय, असं शेलार म्हणाले.

ओबीसींच्या आरक्षणाला नख लागू नये

ओबीसी राजकीय आरक्षण टिकवू शकलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थातील अतिरिक्त आरक्षणाचा खून मविआने पाडला. आरक्षणाचा मुडदा पडल्यानंतर वडेट्टीवार-भुजबळ हे सत्तेत मदमस्त कसे राहू शकतात? ओबीसींच्या आरक्षणाला नख लागू नये, ही आमची मागणी आहे.

मुंबई वरळीपुरतीच आहे का?

मुंबईचं क्षेत्रफळ हे चर्चगेटपासून दहीसरपर्यंत ते सीएसटीपासून मुलुंडपर्यंत आहे. पण मुंबई वरळीपुरती मर्यादित राहिलीय का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. जम्बो कोव्हिड सेंटर, फूटपाथ, ट्रॅफिक सिग्नल सगळं काही वरळीत, वरळी सिलिंकवरुन गाडी निघते ते थेट वांद्रे पूर्वमध्ये निघते. पावसाचं पाणी तुंबू नये यासाठी पम्प फक्त कलानगर सिग्नललाच बसतात. म्हणून मुंबई सगळ्यांची आहे, विकास सगळ्यांचा व्हावा ही आमची मागणी आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांची पत्रकार परिषद

संबंधित बातम्या  

BMC Election 2022 : तयारीला लागा, मुंबई मनपाची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं, वॉर्ड पुनर्रचनेचे आदेश

(BJP MLA Ashish Shelar attacks Shiv Sena over BMC election 2022 CM Uddhav Thackeray Aaditya Thackeray targeted)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.