संजय राऊत जगातील 182 देशांचे प्रमुख, चंद्रकांत पाटलांकडून शालजोड्या

संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. (BJP MLA Chandrakant Patil Criticism Shivsena MP Sanjay Raut) 

संजय राऊत जगातील 182 देशांचे प्रमुख, चंद्रकांत पाटलांकडून शालजोड्या
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 4:15 PM

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत हे जगातील 182 राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण जगातील विषयांवर मत आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. (BJP MLA Chandrakant Patil Criticism Shivsena MP Sanjay Raut)

संजय राऊत हे तर सर्व राष्ट्रांचे प्रमुख आहेत. जगभरातील 182 देशांचे राष्ट्रप्रमुख हे संजय राऊत आहेत. एवढ्या वर्षानंतर या जगामध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे. त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील नव्हे, तर संपूर्ण जगातील विषयांवर मत आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काय बोलणार, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी याबद्दलची भूमिका मांडली. पुण्यातील बोपोडी येथील एका कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली.

संजय राऊतांची टीका 

भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात राज्यात सत्ता दिल्यास कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून आपण अजून चांगली अपेक्षा करु शकत नाही.

निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. एक घटनात्मक प्राधिकरण असूनही निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (BJP MLA Chandrakant Patil Criticism Shivsena MP Sanjay Raut)

संबंधित बातम्या : 

निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये : संजय राऊत

‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’; राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचे राऊतांना सॉल्लिड प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.