खडसे साहेब, माझ्या मतदारसंघात लक्ष घालण्यापेक्षा तुम्ही का हरला ते बघा, महाजनांचा पहिला वार

भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात असल्याचा केवळ आभास निर्माण केला जात आहे. | Girish Mahajan

खडसे साहेब, माझ्या मतदारसंघात लक्ष घालण्यापेक्षा तुम्ही का हरला ते बघा, महाजनांचा पहिला वार
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 7:40 PM

मुंबई: एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपला लागलेल्या ‘गळती’वर अखेर गिरीश महाजन यांनी मौन सोडले आहे. एकनाथ खडसे यांनी माझ्या मतदारसंघात लक्ष घालण्यापेक्षा स्वत:च्या पराभवाचं आत्मपरीक्षण करावं, असा पलटवार महाजन यांनी केला आहे. (BJP mla Girish Mahajan take a dig at Eknath Khadse)

एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत मंगळवारी जामनेरमधील भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. जामनेर हा गिरीश महाजन यांना बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना एकनाथ खडसे केवळ आभास निर्माण करत असल्याचा दावा केला. भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात असल्याचा केवळ आभास निर्माण केला जात आहे.

जामनेरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये एकही जण भाजपचा सदस्य नव्हता. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनाच राष्ट्रवादीत घेतले, ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचे भासवले गेल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. तसेच आता एकनाथ खडसे यांनी माझ्या जामनेर मतदारसंघात लक्ष घालण्यापेक्षा स्वत:च्या मतदारसंघात लक्ष घालावे. आपण का हरलो, याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला. यापूर्वी गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये खडसे यांच्या जाण्याने भाजपला फरक पडणार नाही, असा दावा केला होता. खडसे यांच्यासोबत केवळ भाजपमधील हवशे-नवशे लोकच जातील, असेही त्यांनी म्हटले होते.

महाजनांच्या बालेकिल्ल्याला खडसेंचा सुरुंग राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत. भाजपचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी सुरुंग लावला. जामनेरमधील ‘दोन बस’ भरुन भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले.

दोन लक्झरी बसेस भरुन भाजप कार्यकर्ते पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. खडसेंच्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील भाजपच्या 200 कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यावेळी उपस्थित होत्या.

“भाजपला ताकद दाखवून देतो” आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी कालच केली होती. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही; महाजनांचा खडसेंना टोला

ताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी

खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

(BJP mla Girish Mahajan take a dig at Eknath Khadse)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.