…तर शरद पवार हे समशुद्दीन झाले असते, अजित पवार हे अजदुद्दीन… भाजप नेत्याची जहरी टीका!
मतांसाठी लोकांमध्ये चुकीचं वातावरण निर्माण करणं, महापुरुषांचा अपमान करणं, हे अयोग्य आहे. लोकं उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता राहणार नाही, असा इशारा भाजप नेत्याने दिला आहे.
सागर सुरवसे, सोलापूरः छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) नसते तर जितेंद्र हा जितुद्दीन असता, अजित हे अजदुद्दीन तर शरद पवार (Sharad Pawar) हे शमशुद्दीन असते, अशी घणाघाती टीका भाजप नेत्याने केली आहे. मुघलशाही नसती तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहासच लिहिला गेला नसता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. भाजपचे फायर ब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांनी आव्हाड यांच्यावर जहरी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून शरद पवार…
सोलापुरात गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘ जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. पण आव्हाड यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार मताच्या घाणेरड्या राजकारणासाठी गरळ ओकू नये. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नसते तर जितेंद्र हा जितुद्दीन , अजित हे अजदुद्दीन, शरद पवार हे शमशुद्दीन झाले असते. त्याला सांगायला नव्या कुणाची गरज नाही.
मतांसाठी लोकांमध्ये चुकीचं वातावरण निर्माण करणं, महापुरुषांचा अपमान करणं, हे अयोग्य आहे. लोकं उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता राहणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
आभाळाला हात टेकल्यासारखे वागू नका….
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. तर पाच पैके फक्त एक जागेवर भाजपच्या उमेदवाराला यश मिळालं. आता पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूकदेखील भाजपासाठी कठीण आहे, असं म्हटलं जातंय. यावरून गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली.
पडळकर म्हणाले, ‘ मविआनं इतक्यात हुरळून जायची गरज नाही. आभाळाला हात टेकल्यासारखं वातावरण दिसतंय. परंतु पाच निवडणुकांतील मतांची बेरीज केली तर अडीच लाखांच्या वर जात नाही. एवढ्या कमी संख्येत मतदान, टक्केवारी आहे. विधानसभेचं गणित पूर्णपणे वेगळं असतं
3 ते 4 लाख मतदार एका मतदार संघात असतात. त्या निवडणुकीत राज्य आणि केंद्र सरकारचं काम लोकांना माहिती आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजपच्या बाजूने मतदार उभे राहतील. दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी दर्शवला आहे.