जखमी आमदार पोहचणार मतदानाला; भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप उद्या येणार मुंबईत, सेना आमदार महेंद्र दळवी पोहोचले रिट्रीटला

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दगाफटका टाळण्यासाठी भाजपसह महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांनी आपल्या आपल्या आमदारांना एकत्र आणले आहे.

जखमी आमदार पोहचणार मतदानाला; भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप उद्या येणार मुंबईत, सेना आमदार महेंद्र दळवी पोहोचले रिट्रीटला
आमदार Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 6:30 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha elections)आता अवघे काहीच तास उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपआपले आमदार मतदानासाठी एकाछताखाली आणण्यास सुरूवात केली आहे. तर जे आणदार अजूनही त्यांच्या मतदारसंघात आहेत त्यांच्या नजर ठेवली जात असून त्यांना ही त्यांचा मुंबईतील ऐच्छीक स्थळी हजर राहण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. कारण उद्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे अशा वेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेने (Shiv Sena) आपले आमदार ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले होते. मात्र ऐणवेळी त्यांचा पत्ता बदलत त्यांना मार्वे बीच येथील रिट्रीट हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. तर भाजपणे पक्षाबरोबर असलेल्या अपक्ष आमदारांची ताज हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था करत खबरदारी घेतली आहे. त्याचदरम्यान आता अलीबागचे सेनेचे आमदार महेंद्र दळवी रिट्रीटला पोहोचले आहेत. तर पुण्यातील भाजपचे (BJP) आमदार लक्ष्मण जगताप हे उद्या थेट मतदानासाठी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे भाजपसह शिवसेनेला जीवात जीव आल्यासारखे सध्यातरी वाटत आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दगाफटका टाळण्यासाठी भाजपसह महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांनी आपल्या आपल्या आमदारांना एकत्र आणले आहे. शिवसेनेने आपले आमदार रिट्रीट हॉटेलवर ठेवले आहेत. तर जे अजूनही त्यांच्या मतदारसंघात आहेत त्यांना मतदानाच्या आधी रिट्रीट हॉटेलवर येण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार अलीबागचे सेना आमदार महेंद्र दळवी हे रिट्रीट हॉटेलवर पोहचले आहेत. त्यांच्या पायाला इजा झालेली होती. मात्र पक्षाने व्हीप बजावल्याने तर पायाला इजा झालेली असतानाही ते मतदानासाठी आणि आजच्या बैठकीसाठी पोहोचले आहेत.

हे सुद्धा वाचा

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप उद्या मुंबईत

दरम्यान या निवडणूकीत कोणताच दगाफटका बसू नये म्हणून भाजपकडूनही काळजी घेण्यात आली आहे. भाजपने आपले आमदार ताज हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहेत. तर जे अजूनही मुंबईत आलेले नाहीत त्यांना पोहचण्याच्या सुचना करण्यात आलेल्या आहेत. यादरम्यान पुण्यातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे उद्या थेट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याची माहिती मित आहे. काही दिवस हॉस्पिटलमध्ये जगताप हे उपचार घेत होते. तर गेल्या आठवड्यात त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. पण प्रकृती ठीक नसल्याने अँम्बुलन्समधून लक्ष्मण जगतापांना थेट मतदानासाठी मुंबईत आणलं जाणार आहे. त्यांना पुणे ते मुंबई बायरोड आणलं जाणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.