भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या पतीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

केज विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना एकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी केल्याचा प्रकार समोर आलाय. याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या पतीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!
नमिता मुंदडा, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 11:26 PM

बीड : माजी आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा यांचा मुलगा आणि केज विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना एकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी केल्याचा प्रकार समोर आलाय. याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामावरुन हा प्रकार घडल्याचं माहिती मिळतेय. या प्रकरणी अक्षय मुंदडा यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. (MLA Namita Mundada’s husband Akshay Mundada was insulted and threatened with death)

दोन महिन्यांपूर्वी ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे याचा फोन आला होता. त्याने फोनवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगा केली. तसंच जीवे मारण्याची धमकी दिल्याचं अक्षय मुंदडा यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामावरुन हा प्रकार घडल्याचं अक्षय मुंदडा यांनी सांगितलं. त्यावेळी आपण फोनवर संभाषण रेकॉर्ड केल्याचं ते म्हणाले. या प्रकरणी मुंदडा यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 500, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

नमिता मुंदडा यांची धनंजय मुंडेंवर टीका

ऐन काढणीवेळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी करत आहेत. बीड जिल्ह्यातही शेतकऱ्याचं शेती पिकांसह शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पालकमंत्री आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केलीय.

मराठवाड्यात, प्रामुख्यानं बीड जिल्ह्यात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. असं असतानाही सरकार मदतीसाठी पुढे येत नाही. अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेती उद्ध्वस्त झालीय. अनेक घरांची पडझड झाली आहे. पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. विद्यमान पालमंत्र्यांनी अद्याप कसलीही मदत जाहीर केली नाही. राज्यात ओला दुष्काळ अद्याप का जाहीर केला नाही? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केलाय.

‘शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत द्या’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यात यावं. नुकसानाची भीषण दृष्य पाहावीत. पालकमंत्री काय करतात आम्हाला माहिती नाही. मात्र, लोकांना मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केलीय.

इतर बातम्या :

आमच्या काळात जे विमा कंपन्यांचे ऑफिस फोडत होते ते आता सत्तेत, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, लंके कुटुंब भारावलं; आमदार महोदयांच्या भावना काय?

MLA Namita Mundada’s husband Akshay Mundada was insulted and threatened with death

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.