“औरंगाबादचं नाव बदलायला सांगितलं यांनी विमानतळाचं बदललं, मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच म्हणू का?”

आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) करा अशी मागणी केली होती", असं नितेश राणे म्हणाले.

औरंगाबादचं नाव बदलायला सांगितलं यांनी विमानतळाचं बदललं, मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच म्हणू का?
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 11:42 AM

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Sarkar) हल्लाबोल केला. “आम्ही औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (Aurangabad Sambhajinagar) करा अशी मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर तसं असेल तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का? मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, अन्यथा काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (BJP MLA Nitesh Rane attacks on CM Uddhav Thackeray over Aurangabad renaming issue)

औरंगाबादच्या नामांतरावरुन उफाळलेल्या वादावर नितेश राणेंनी जोरदार प्रहार केला. “शिवसेनेची लायकी नामकरण प्रकरणावरुन कळली आहे. सेनेलामहाविकास आघाडीमध्ये काडीची किंमत नाही”, असं नितेश राणे म्हणाले.

शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेसवर निशाणा

यावेळी नितेश राणेंनी दिल्लीतील काँग्रेस आंदोलनावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. “विरोध कुठे आणि काशासाठो होतोय हे महत्त्वाचं आहे. विरोध करणाऱ्यांना शेतकऱ्यांचं हित साधायचं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या रॅलीमध्ये लोकांना बोलवावं लागत नाही. कोकणातील शेतकरी कृषी कायद्याचं स्वागत करत आहेत. काँग्रेसने 2019 च्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख केला. काँग्रेस बोलत राहिले पण पंतप्रधान मोदींनी करुन दाखवलं, असं नितेश राणे म्हणाले.

शेतकरी संघटना आतून या कायद्याला समर्थन देत आहेत. राज्यात या कायद्याबाबतीत राष्ट्रवादीची भूमिका काय? शिवसेनेला कायदे कळले तरी आहेत का? काँग्रेसला फक्त विरोध करायचा आहे. राहुल गांधी वायनाडमधून निवडून येऊ शकतात मग कोकणातील शेतकरी बाहेर माल का विकू शकत नाही? असे सवाल नितेश राणेंनी उपस्थित केले.

(BJP MLA Nitesh Rane attacks on CM Uddhav Thackeray over Aurangabad renaming issue)

संबंधित बातम्या 

सिंधुदुर्गात नितेश राणेंचा शिवसेनेला पुन्हा धक्का 

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग त्यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का? नितेश राणेंचं टीकास्त्र 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.