‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

मुख्यमंत्र्यांच्या कोकण पाहणी दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केलीय.

'यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा', नितेश राणेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर प्रहार
भाजप आमदार नितेश राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 4:10 PM

मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यानं नुकसान झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. त्यावेळी त्यांनी चिवळा बीच आणि मालवणच्या नुकसानाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा प्रहार केलाय. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीही नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हा दौरा केवळ फोटोसेशनसाठी असेल, असं नितेश राणे म्हणाले होते. आज मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही त्यांनी ‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा’, असा टोला हाणलाय. (Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray’s Konkan inspection tour)

मुख्यमंत्र्यांच्या एकदिवसीय पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर नितेश राणे यांनी ट्वीट केलंय. ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा. मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही. मोजून 10 km आतच. विमानतळावरचा आढावा. दौरा संपला!!! ईथे.. फडणवीसजीं चा 700kms चा झंझावात.. कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!!’, अशा शब्दात नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीही टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीही नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असंही राणे म्हणाले होते.

‘मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका उद्वव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. ते आज कोकणाच्या पाहणी दौऱ्यावर होते. कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या :

‘कोकणावर राजकारणासाठी जेवढं प्रेम केलं जाते, तेवढंच प्रेम अशा संकटाच्या काळातही केलं जावं’, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मोदी संवेदनशील, पण मी विरोधी पक्षनेत्यासारखं वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा जहरी वार

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का? RTI मध्ये विचारणा, निलेश राणेंचं उद्धव ठाकरेंकडे बोट

Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray’s Konkan inspection tour

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.