मुंबई (महेश सावंत) : “आज सकाळी 10 जनपथचा नवीन कामगार, ज्याचा पगार राहुल गांधींकडून येतोय, तो नॅशनल हेराल्डची बाजू मांडताना दिसला. नॅशनल हेराल्ड काँग्रेसचे काम करते, तेच काम आता सामना करत आहे” अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. “19 नोव्हेंबरला इंदिरा गांधी यांची जयंती, मग भारत जिंकला पाहिजे होता. मग खरी पनौती कोण?” असा सवाल नितेश राणे यांनी विचारला. “नरेंद्र मोदी म्हणजे राष्ट्रपिता. जो आपल्या देशाचा नाही, त्या राहुल गांधीना देश प्रेम कधीच कळणार नाही” अशी टीका नितेश राणे यांनी केली.
“सकाळी 90 मारल्याचा इफेक्ट आहे. भाजपमध्ये आल्यावर कोणाची प्रॉपर्टी मोकळी झाली ते सांगावं. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, त्यांची प्रॉपर्टी जप्त होणार” असं नितेश राणे म्हणाले. “ज्या डॉक्टर महिलेच्या घरावर दारूच्या बाटल्या मारल्या, त्यावर कारवाई करण्याची मागणी मी गृहमंत्रालयाला करणार आहे” असं नितेश राणे म्हणाले.
‘आता उद्धव ठाकरे मुल्ला झालेला आहे’
“मातोश्रीची नवीन मम्मी 10 जनपथ वर असेल तर हा राहुल गांधीची बाजू घेणारच. भाजपा सोबत ज्या शिवसेनेची युती होती, तो बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ होता. आता उद्धव ठाकरे मुल्ला झालेला आहे” अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. “फिल्म फेस्टिवल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळा बैठका ह्याच काय साम्य आहे. सिंधुदुर्ग तो बहाना है. पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के Actors के साथ नाचना है” अशा शब्दात टीका केली.