Nitesh Rane : शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंना जीवे मारण्याची धमक्या आल्या होत्या, नितेश राणेंच्या राजकीय ट्विटमुळे खळबळ
एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरुक्षा देण्यात आली होती. शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरुक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सुचना नव्हत्या.
मुंबई – नितेश राणे (Nitesh Rane) मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) विरोधकांरती जोरदार टीका करीत आहे. त्याचा आक्रमकपणा नेहमी पाहायला मिळतो, तसेच ते विरोधकांचा नेहमी ट्विटरच्या माध्यमातून समाचार घेत असतात. नितेश राणे यांनी एक नवं ट्विट केलं आहे. त्यातून त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यावेळी नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती असा दावा त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या ट्विटच्या जोरात चर्चा सुरु झाली आहे. तसेच त्यांनी पुढे ट्विटमध्ये माऊ माऊ संपू दे…मग आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु असा आशय लिहिला आहे. सकाळी नितेश राणेंनी हे ट्वि्ट केल्यापासून राजकीय चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा पुरवू नका अशी सुचना दिल्याचा त्याच्यावरती आरोप करण्यात आला आहे.
Just like Eknath Shinde ji .. several “suparis”were given to finish my father when he left the Sena.. by the so called sober and decent Paksha Pramukh! Let the meow meow finish.. then we will start with the “Vastraharan” with interest ?
हे सुद्धा वाचा— nitesh rane (@NiteshNRane) July 23, 2022
नेमकं काय आहे ट्विटमध्ये
सध्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी सध्या सभ्य वाटणाऱ्या पक्षप्रमुखांनी माझ्या वडिलांना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या होत्या. एकदा म्याँव म्यांव संपूदे त्यानंतर आम्ही योग्य प्रकारे वस्त्रहरण करू, त्याचबरोबर सहव्याज परफेड करू असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरुक्षा देण्यात आली होती
एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरुक्षा देण्यात आली होती. शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरुक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सुचना नव्हत्या. सार्वजनिक जीवनात काम करत असताना अशा धमक्या येत असतात. एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांनी पत्र दिल्यानंतर जेवढी सुरक्षा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना होती तेवढीच एकनाथ शिंदेंना होती. एकनाथ शिदे आणि शंभुराजे देसाई एकाच गटाचे आहेत म्हणून ते आरोप करतायत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नोंद गुन्ह्यांचा तपास या सरकारने जरी केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिला तरी योग्य तपास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना या सरकारने स्थगिती दिलीय हे दुर्दैवी. अजित दादांनी असेच धडाडीने काम करुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याला पुढे न्यावे या शुभेच्छा