करारा जवाब मिलेगा पर तारीख नही बताऐंगे, नितेश राणेंचा शिवसेनेला धमकीवजा इशारा

शिवसेनेला करारा जवाब दिला जाईल पण कधी त्याची तारीख सांगणार नाही, अशी धमकीवजा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

करारा जवाब मिलेगा पर तारीख नही बताऐंगे, नितेश राणेंचा शिवसेनेला धमकीवजा इशारा
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 1:56 PM

सिंधुदुर्ग : शिवसेनेला करारा जवाब दिला जाईल पण कधी त्याची तारीख सांगणार नाही, अशी धमकीवजा इशारा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्यावर कारवाई करताना षडयंत्र रचलं गेलं. कारवाईदरम्यान कुठेही राजशिष्टाचार पाळला गेला नाही. शिवसेनेला या सगळ्या प्रकरणात करारा जवाब दिला जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

शिवसेनेला करारा जवाब देऊ

नारायण राणे यांच्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं आहे. त्यांच्याविरोधात म्हणजेच एका केंद्रीय मंत्र्यांविरोधात अॅक्शन घेताना नियमांचा भंग काल केला गेला. या सगळ्यात कुठेही राजशिष्टाचार पाळला गेला नाही. प्रसंगी त्यांना जेवणाच्या ताटावरुन उठवून गेलं, आम्ही या सगळ्याला करारा जवाब देऊ, असा आक्रमक पवित्रा नितेश राणेंनी घेतला.

‘मातोश्री’ला कोण जास्त खुश करत याची स्पर्धा लागलीय!

“मातोश्रीला कोण जास्त खुश करत याची स्पर्धा लागलेली आहे.आमदारांना मंत्री बनायचं आहे. मंत्र्यांना आपलं पद शाबूत ठेवायचं आहे.. त्यांनी राणेंवर टीका करायची. जशी ऑलम्पिकची स्पर्धा लागली आहे. आमच्यामुळे त्यांची बेरोजगारी कमी होत असेल… त्यांना पद भेटत असतील तर आमचा त्यांना आशीर्वाद आहे”, असा टोला त्यांनी शिवसेना नेत्यांना लगावला.

नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. कोकणात शिवसेना भाजप यांच्यादरम्यान वातावरण तापलं आहे. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेनेकडून विरोध होऊ शकतो, ही शक्यता ठेऊन नितेश यांनी आधीच सेनेला इशारा दिला आहे.

सिंधुदुर्गात जनआशीर्वाद यात्रा नियम पाळून होणारच

यात्रेला विरोध करायला आमदार वैभव नाईक यांनी यावं. मग आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ… हत्ती चालतो तेव्हा कुत्रे भुंकत असतात. नियम पाळून आम्ही यात्रा काढणार आहोत. यात्रा निघणारच…. सिंधुदुर्गात यात्रेचा दिमाखदार शेवट होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

राणेंच्या स्वागतासाठी कणकवली शहर सज्ज

नारायण राणे यांच्या स्वागतासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेलं कणकवली शहर सज्ज झालंय. अगदी पहिल्यापासून राणेंना ज्या कणकवलीने डोक्यावर घेतलं, त्यांना कधी अंतर दिलं नाही, त्याच राणेप्रेमी कणकवली शहरांत चौकाचौकात राणेंच्या स्वागताला गुढ्या उभारल्या गेल्या आहेत. कालच्या राणे-सेना राड्यानंतर दादांचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसलीय.

नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील नियोजित कणकवली दौरा होता. परंतु त्यांनी केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वक्तव्याने मंगळवारी दिवसभर राडा झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली. रात्री उशिरा त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री त्यांनी महाडवरुन मुंबईकडे प्रयाण केलं. बुधवार आणि गुरुवारी आराम करुन ते शुक्रवारी जनआशीर्वाद यात्रा सुरु करणार आहेत.

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी कणकवली सज्ज झालेली आहे. कणकवली हा राणे परिवाराचा बालेकिल्ला आहे. कणकवलीत राणेंच्या होणाऱ्या स्वागताची सर्वांना उत्सुकता आहे. शहरभर यात्रेच्या स्वागताचे आधीच फलक लागले आहेत. रात्री राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर मध्यरात्री शहरात गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. शहरात पटवर्धन चौकात रस्त्याच्या बाजूला रात्री गुढ्या उभ्या केल्या गेल्या. मुख्य चौकात आकाशकंदील लावले गेलेत. एकंदरितच कणकवलीतील राणेंचं स्वागत जंगी होणार आणि राणेसमर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करणार हे नक्की…!

(BJP MLA Nitesh Rane Warning Shivsena After Arrest Action on narayan Rane )

हे ही वाचा :

अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही, राऊत कडाडले

अनिल परब पोलिसांच्या संपर्कात असलेला व्हिडीओ, आता त्याच व्हिडीओत दिसणारे उदय सामंत म्हणतात..

राजकीय पक्षात मतभेद असतात, पण… गिरीश बापटांचा नारायण राणेंना घरचा आहेर

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.