औरंगाबाद : औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार प्रशांत बंब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे हे भागवत कराड यांच्याशी कधीच बरोबरी करु शकणार नाहीत, अशी टोला बंब यांनी लगावला आहे. इतकंच नाही तर चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना बंब यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं कौतुक केलं आहे. त्यांचे आणि आमचे मतभेद असले तरी त्यांच्या कामाबाबत त्याचं कौतुक करावं लागे, असं प्रशांत बंब म्हणाले. (BJP MLA Prashant Bamb praises AIMIM MP Imtiaz Jalil)
चंद्रकांत खैरे यांचं औरंगाबाद शहरावर 30 वर्षे राज्य होतं. पण या 30 वर्षाच्या काळात त्यांनी औरंगाबाद शहर पूर्णपणे खिळखिळं करुन टाकलं. त्यांनी औरंगाबाद शहराची वाताहत केली. चंद्रकांत खैरे हे कधीच भागवत कराड यांची बरोबर करु शकणार नाहीत. औरंगजेबाच्या आधी मलिक अंबरने शहरासाठी चांगलं काम केलं होतं. आता दानवे आणि कराड हे दोघे मिळून शहराचा विकास करतील असा दावाही बंब यांनी केलाय. इतकंच नाही तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचंही बंब यांनी कौतुक केलं आहे. इम्तियाज जलील तरी एमआयएम पक्षाचे खासदार असतील तरी ते शहरात खैरे यांच्यापेक्षा काही विकासाची चांगली काम करत आहेत, हे आपण मानलं पाहिजे. जरी एमआयएम आणि आम्ही भविष्यातही विरोधक असू, पण जी चांगली काम आहेत त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, असंही बंब म्हणाले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला uale.. दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात बसून पैसे वाटप केले. त्यामुळे माझा पराभव झाला. जावयाला पुढे करून दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे, असा हल्लाही खैरे यांनी चढवला होता.
यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही टीका केली. कराड यांना मीच नगरसेवक केलं. मीच त्यांना महापौर केलं. मी त्यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा दरम्यान सलग एकच फ्लायओव्हर रस्ता व्हावा याबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो असल्याचं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. सध्या औरंगाबादेत तीन ओव्हर ब्रीज आहेत. त्यांना जोडून एकच वस फेस प्लायओव्हर व्हावा यासाठी एक्स्पर्ट एजन्सीकडून लवकर पाहणी होणार असल्याची माहिती जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
संबंधित बातम्या :
VIDEO: कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही: चंद्रकांत खैरे
BJP MLA Prashant Bamb praises AIMIM MP Imtiaz Jalil