आपलं घराणं कुठलं, करताय काय?, बाईक चालविण्यापेक्षा नगरपालिका व्यवस्थित चालवा, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर वार

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातली सुंदोपसुंदी नवीन नाहीय. भलेही एका पक्षात का असेना पण त्यांच्यातलं वैर काही मिटत नाही. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने सामने आले आहेत.

आपलं घराणं कुठलं, करताय काय?, बाईक चालविण्यापेक्षा नगरपालिका व्यवस्थित चालवा, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर वार
शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 8:48 AM

सातारा :  साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातली सुंदोपसुंदी नवीन नाहीय. भलेही एका पक्षात का असेना पण त्यांच्यातलं वैर काही मिटत नाही. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने सामने आले आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना थेट घराण्याची आठवण करुन देत, आपलं घराणं कुठलं, आपण करताय काय?, असा सवालच विचारलाय.

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारच्या विकासकामांच्या शुभारंभाचा चांगला धडाका लावला आहे. यावर बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंनी चालवलेली दुचाकी आणि पोस्टरबाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

दुचाकी चालवण्यापेक्षा 5 वर्षे सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर…!

उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टर बाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकासकामांवर खर्च केला असतातर बरं झालं असत. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने खा.उदयनराजे यांची ही नौटंकी सुरू असल्याचे टोला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावलाय.

आरोग्यमंत्र्यांचा पत्ता माहिती नव्हता की काय?

खासदार उदयनराजेंनी एकदा आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला असं नसून मेडिकल कॉलेजसाठी सर्वांनी प्रयत्न केले आहेत. मग 10 वर्षे खासदार असताना आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली नाही का? की आरोग्यमंत्री यांचा पत्ता माहिती नव्हता, असा खोचक सवालही यावेळी शिवेंद्रराजेंनी विचारला.

आपलं घराणं कुठलं, करताय काय?

सातारा सर्किट हाऊसवर झालेल्या उदयनराजे आणि रामराजे यांच्या भेटीवर बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, ज्या रामराजेंना दाखवतो आणि बघतोची भाषा केली त्यांच्याशी चर्चा करायला कशाला जायचं. आपलं घराणं कुठलं? छत्रपती घराणे आहे असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

हे ही वाचा :

‘देता की जाता’, शेतकरी मदतीवरुन आमदार राणाजगजितसिंह पाटील आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेत्यांची खलबतं, बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा?

एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, पत्नी मंदाकिनी खडसेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.