Suresh Dhas | भाजप आमदार सुरेश धस होम क्वारंटाईन, प्रत्यक्ष भेट टाळण्याचे आवाहन

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं (BJP MLA Suresh Dhas Home Quarantine) आहे.

Suresh Dhas | भाजप आमदार सुरेश धस होम क्वारंटाईन, प्रत्यक्ष भेट टाळण्याचे आवाहन
Follow us
| Updated on: Aug 14, 2020 | 4:08 PM

बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. स्वत: अधिकृत फेसबुक पेजवरुन त्यांनी याबाबतची माहिती दिली.  (BJP MLA Suresh Dhas Home Quarantine)

“कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मी स्वत: आज विलगीकरणात (होम क्वारंटाईन) जात आहे. तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की, पुढील काही दिवस माझी प्रत्यक्ष भेट घेणे टाळावे,” असे आवाहन सुरेश धस यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन केलं आहे.

“अत्यावश्यक कामासाठी मी मोबाईलवर 24 तास उपलब्ध असेल. माझे सहकारी देखील सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतील. आपण देखील आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरातच रहा, सुरक्षित रहा,” असेही ते म्हणाले.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

राज्यात यापूर्वी काही मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली होती.  (BJP MLA Suresh Dhas Home Quarantine)

संबंधित बातम्या : 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन, बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह

BJP MLA Rahul Kool Corona | दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.