बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. स्वत: अधिकृत फेसबुक पेजवरुन त्यांनी याबाबतची माहिती दिली. (BJP MLA Suresh Dhas Home Quarantine)
“कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मी स्वत: आज विलगीकरणात (होम क्वारंटाईन) जात आहे. तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की, पुढील काही दिवस माझी प्रत्यक्ष भेट घेणे टाळावे,” असे आवाहन सुरेश धस यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन केलं आहे.
“अत्यावश्यक कामासाठी मी मोबाईलवर 24 तास उपलब्ध असेल. माझे सहकारी देखील सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतील. आपण देखील आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरातच रहा, सुरक्षित रहा,” असेही ते म्हणाले.
राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण
राज्यात यापूर्वी काही मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.
पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली होती. (BJP MLA Suresh Dhas Home Quarantine)
संबंधित बातम्या :
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन, बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह
BJP MLA Rahul Kool Corona | दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण