“भाजप आमदारांचं निलंबन मागे घ्या, अन्यथा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही”

आमदारांच्या निलंबनानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज नागपुरात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला इशाराच दिलाय.

भाजप आमदारांचं निलंबन मागे घ्या, अन्यथा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही
CHANDRASHEKHAR BAWANKULE
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 4:13 PM

नागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत तुफान राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजप आमदारांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केल्यानंतर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलं. आमदारांच्या निलंबनानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज नागपुरात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला इशाराच दिलाय. (After the suspension of BJP MLAs, Chandrasekhar Bavankule warned the Mahavikas Aghadi government)

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी त्यांनी आज नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन दिलं. त्याचबरोबर राज्यात ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी सरकारमधील काही झारीतले शुक्राचार्य कारणीभूत आहे, असा घणाघातही बावनकुळे यांनी केलाय. डिसेंबर 2022 पर्यंत राज्यातील 80 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होईपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळू न देण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

जोपर्यंत निलंबन मागे नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार

महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित केलं. महाराष्ट्र सरकारने विधीमंडळाचा वापर राजकीय कामांसाठी केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे. राज्यातील दीड हजार ठिकाणी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. जोपर्यंत त्या 12 आमदारांचं निलंबन रद्द होत नाही तोपर्यंत राज्यात आंदोलन सुरु राहील. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ठराव घेतला आहे. विधान मंडळाचा वापर राजकारणाकरिता केलाय, अशी टीका भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी काल एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती काल विधानसभेत दिली.

संबंधित बातम्या :

विधिमंडळ सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम, जयंत पाटी, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

भाजपच्या प्रति विधानसभेला भास्कर जाधवांचा आक्षेप, नियम दाखवत म्हणाले, ‘त्यांचा स्पीकर जप्त करा’

After the suspension of BJP MLAs, Chandrasekhar Bavankule warned the Mahavikas Aghadi government

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.