मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणावरुन सभागृहात तुफान राडा पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव अधिवेशनात मांडण्यात आल्यानंतर भाजप आमदार अध्यक्षांसमोरील हौदात उतरले. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्याचबरोबर अध्यक्षांच्या दालनातही मोठा राडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दालनात भाजपचे आमदार आल्यानंतर त्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि आई-बहिणीवरुन शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोपही तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलाय. जाधव यांच्या या आरोपावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधवांवर जोरदार हल्ला चढवलाय. (Atul Bhatkhalkar demands narco test of Bhaskar Jadhav after chaos in Assembly)
‘विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली हे सत्य आहे, ती कोणी केली हे उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मी राज्यपालांकडे करणार आहे. शिवीगाळ करण्याचा इतिहास कोणाचा आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.
विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली हे सत्य आहे, ती कोणी केली हे उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मी राज्यपालांकडे करणार आहे.
शिवीगाळ करण्याचा इतिहास कोणाचा आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.#MahaNapasAghadi— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 5, 2021
महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईनंतर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्यावर झालेल्या कारवाईचा अहवाल मागवण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया तपासून उचित निर्णय घेऊ असं आश्वासन राज्यपाल महोदयांनी दिलं आहे, अशी माहिती शेलार यांनी दिलीय. सभागृहातच नाही तर अन्य कुठेही भाजपच्या एकाही सदस्याने अपशब्द उच्चारला नाही. झालेली कारवाई एकतर्फी आहे. आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं जात नाही. काहीजणांकडून सोशल मीडियावर पसरवले जात असलेल्या व्हिडीओमध्ये असं कुठेही दिसून येत नाही की, भाजप आमदारांनी सभागृहाचा किंवा तालिका अध्यक्षांचा अवमान केलाय, असा दावा शेलार यांनी केलाय.
ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.
OBC आरक्षणावर आक्रमक झालेल्या भाजपाच्या आमदारांचा आवाज दडपण्यासाठी वसूली सरकारने भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले. या दंडेली विरुद्ध दाद मागण्यासाठी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची राजभवन येथे भेट घेतली. pic.twitter.com/C2EIBM5jwo
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 5, 2021
संबंधित बातम्या :
Video : विधानसभेत तुफान राडा! अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय घडलं? भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन का?
Atul Bhatkhalkar demands narco test of Bhaskar Jadhav after chaos in Assembly