वारिस पठाण गुजरात आठवतंय का? : भाजप प्रवक्ते गिरीश व्यास

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याला भाजपनेही तशाच पद्धतीने  (Girish Vyas on Waris Pathan) उत्तर दिलं आहे.

वारिस पठाण गुजरात आठवतंय का? : भाजप प्रवक्ते गिरीश व्यास
Follow us
| Updated on: Feb 21, 2020 | 2:15 PM

नागपूर : एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याला भाजपनेही तशाच पद्धतीने  (Girish Vyas on Waris Pathan) उत्तर दिलं आहे. भाजप प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी वारिस पठाण (Girish Vyas on Waris Pathan) यांना चक्क गुजरातची आठवण करुन दिली आहे.  “वारिस पठाणला गुजरात आठवत असेल, तिथला मुसलमान हिम्मत करत नाही”, असं म्हणत गिरीश व्यास यांनी इशारा दिला. गिरीश व्यास यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

गिरीश व्यास म्हणाले, “वारिस पठाणने एकदा नागपुरात येऊन दाखवावं, आम्ही त्यांची योग्य व्यवस्था करु, आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारिस पठाणवर मुंबईबंदीची कारवाई करुन अटक करावी. वारिस पठाणला देशद्रोही म्हणून पाकिस्तानला पाठवावं. वारिस पठाणला गुजरात आठवत असेल, तिथला मुसलमान हिम्मत करत नाही. वारिस पठाणसारखी जहरी टीका करणाऱ्यांची जीभ छाटण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यात आहे”.

गिरीश व्यास नेमकं काय म्हणाले?

ज्या पद्धतीची भाषा वारिस पठाणने वापरली, त्यांना त्यांच पद्धतीने उत्तर देण्यासाठी देशातील युवक, देशभक्त आणि भाजपचा एक एक कार्यकर्ता तयार आहे. आम्ही संयमी, सहिष्णू आहोत याचा अर्थ असा नाही की याचा आम्ही बिमोड करु शकत नाही. गुजरात त्यांना आठवत असेल, ज्या कालुपूरमध्ये ज्या घटना घडल्या, त्या जर त्यांनी लक्षात घेतल्या, तर मला असं वाटतं की आज तिथला मुसलमान हिम्मत करत नाही वर उठण्याची.

मला आज मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे, ते शिवसेनाप्रमुख आहेत, त्यांनी अशा देशद्रोहीला मुंबईबंदी घालायला हवी. तसंच भारत सरकारने त्याच्यावर बंदी घालून पाकिस्तानमध्ये सोडायला हवं.

वारिस पठाणसारखेच ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांनी देखील अशीच जहरी टीका केली होती. आम्ही सहन केली. पण भगतसिंह देखील इथेच आहेत, चंद्रशेखर इथेच आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे. या राज्यात अशा लोकांची जीभ छाटण्याची ताकद भाजपच्या आणि हिंदूप्रेमी व्यक्तीच्या मनात आहे.

वारिसखान पठाण यांना माझं आव्हान आहे, तुमची जर ताकद असेल,  तर एकदा नागपूरला येऊनच बघा, आम्ही तुमची योग्य व्यवस्था करु. तुम्हाला काय वाटलं, आम्ही काय बांगड्या घातल्यात? आमचे दंड तयार आहेत तुमच्याशी निपटून घ्यायला. पण समाजामध्ये तेढ नको, सुसंवाद राहावा, या भूमिकेत आम्ही आहोत. माझी मुस्लिमांना विनंती आहे, की त्यांनी अशा लोकांचा बहिष्कार केला पाहिजे, जे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना योग्य पद्धतीने मुस्लिम समाजाने धडा शिकवावा, असं आवाहन गिरीश व्यास यांनी केलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.