मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज टापटीप राहतात, ते नेमके कुठे दाढी-केस कापतात, हा एक प्रश्नच आहे, असा टोला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी लगावला. राज्यात सलून-पार्लर बंद असल्याने नाभिक समाजावर अन्याय का? असा प्रश्न लाड यांनी विचारला. (Prasad Lad on Uddhav Thackeray)
नाभिक समाजावर एवढे मोठे बंधन घालण्याचे कारण नाही. मॉल-हॉटेल उघडता, मग नाभिक समाज एक टक्कासुद्धा नाही, त्याच्यावर अन्याय का? नाभिक समाजावरील अन्याय सरकारने दूर करुन कोविड 19 चे सर्व नियम घालून त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी सरकारकडे केली.
महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यास सुरुवात झाली असली, तरी अद्याप मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा सलून, ब्युटी पार्लर उघडण्यात आलेले नाहीत. मात्र केंद्र सरकारने कोविडसंबंधी नियम पाळून मॉल, रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी दिली आहे.
हेही वाचा : लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत स्थान, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, कोकणातील जनता ही शिवसेनाची मालमत्ता असल्यासारखे ठाकरे सरकार वागत आहे, अशी बोचरी टीकाही लाड यांनी केली. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांना 75 कोटी रुपयांची मदत जाहीर करुन कोकणच्या जनतेच्या तोंडाला पाने पासण्याचे काम सरकार करत आहे. त्यांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली.
ममतादीदी, ‘कोरोना एक्स्प्रेस’ तुमचा ‘एक्झिट रुट’ ठरेल, अमित शाह यांचा घणाघात https://t.co/4hxjnoyhCl #AmitShah @AmitShah #MamtaBanerjee #CoronaExpress
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2020