ओवेसी तुम्ही जोकर सारखेच दिसता, तुम्हाला उलटं लटकवणार, भाजप खासदाराचं वक्तव्य
भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले.
हैदराबाद : भाजपच्या तेलंगणा येथील निझमाबादचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे (BJP MP Arvind Dharmapuri slams Asaduddin Owaisi). “ओवेसी हे जोकर सारखे दिसतात आणि त्यामुळे त्यांना क्रेनला उलटं लटकविले जाणार. ते मुस्लीम मतदारांचे दलाल आहेत”, अशा शब्दांत धर्मपुरी यांनी ओवेसी यांच्यावर निशाणा साधला(BJP MP Arvind Dharmapuri slams Asaduddin Owaisi).
‘असदुद्दीन ओवेसी तुम्ही जोकर सारखेच दिसतात. त्यामुळे तुम्हाला उलटं लटकविले जाणार आहे. जोकर सर्कसमध्ये उलटं लटकतात. तुम्ही मुस्लीम मतांचे दलाल आहात. तुम्हाला दलाली करण्यासाठी काँग्रेसकडून पैसे मिळतात’, अशी टीका अरविंद धर्मपुरी यांनी केली
Arvind Dharmapuri,BJP MP on his statement ‘Will hang Owaisi upside down’: You(Asaduddin Owaisi) look like a clown so you will be hung upside down, clowns do this in circuses. You are broker of Muslim votes,earlier Congress used to pay you more for your brokerage,now TRS pays more pic.twitter.com/ga0EsExjAI
— ANI (@ANI) January 7, 2020
एमाआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी नेहमी भाजपवर टीका करत असतात. तर भाजपचे नेते देखील ओवेसी यांच्यावर सडकून टीका करतात. काही दिवसांपूर्वी अरविंद धर्मपुरी यांनी ओवेसी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच वक्तव्याबाबत प्रश्व विचारला असता त्यांनी ओवेसी यांना जोकर म्हटले.
याअगोदरही धर्मपुरी यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. ‘ओवेसी मी तुम्हाला आव्हान देतो की मी तुम्हाला क्रेनला उलटा टांगेल आणि तुमची दाढी कापून टाकेल. तुमची ही दाढी मी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना चिपकवेल आणि त्याचे प्रमोशन करेल’, अशा शब्दांत त्यांनी ओवेसींवर टीका केली होती. या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता धर्मपुरी यांनी ओवेसी यांना जोकर म्हटले.
BJP Nizamabad MP Dharmapuri Arvind: I warn you(Asaduddin Owaisi) that I will hang you upside down to a crane and shave your beard. I will give promotion to your beard by sticking it to the Chief Minister. #Telangana (3.1.20) pic.twitter.com/9Tpy43Qb4P
— ANI (@ANI) January 4, 2020