मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात मला मंत्रिपद दिले तरी नको, मी खासदार म्हणूनच ठीक आहे, अशी भूमिका मुंबईतील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी घेतली आहे. केंद्रात मंत्रिपदासाठी शेट्टी तूर्तास तरी इच्छुक नाहीत. (BJP MP Gopal Shetty doesnt wishes Ministry in Modi Government)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ फेरबदलात माझे नाव असल्याची चर्चा मी माध्यमांतून ऐकली. मात्र मला मंत्रिपद नको. मी खासदार म्हणून काम करत राहीन, अशी प्रतिक्रिया खासदार गोपाळ शेट्टी यानी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.
जुलै महिन्यात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात राज्यातून गोपाळ शेट्टी आणि सुरेश प्रभू यांची नावे चर्चेत आहे.
मंत्रिपदाला न्याय देऊ शकतील अशी माझ्यापेक्षा चांगली व्यक्तिमत्व भाजपात आहेत. मी खासदार राहूनच जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करु शकतो, असं मत गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : 1962 ते आजच्या घडामोडी, संसदेत दोन हात करुया, अमित शाहांचे राहुल गांधींना खुले आवाहन
गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांनी अभिनेत्री काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना पराभवाची धूळ चारली होती. तब्बल 4 लाख 65 हजार 247 चे मताधिक्य मिळवत ते विजयी झाले होते.
शेट्टी सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले आहेत. याआधी दोन वेळा त्यांनी आमदारकी भूषवली आहे. तर भाजप मुंबईचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. मात्र केंद्रात मंत्रिपद घेण्याची त्यांची इच्छा नाही.
पुण्यातील परिवर्तन या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून खासदारांचं रिपोर्ट कार्ड समोर आले होते. त्यात विधेयकांच्या बाबतीत भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
पडळकर, रात्रभर झोप येणार नाही अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ, हसन मुश्रीफ यांचा दमhttps://t.co/mp5DYkuN6C#HasanMushrif #GopichandPadalkar #SharadPawar@mrhasanmushrif @BJP4Maharashtra @PawarSpeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2020