Video | हातानेच टॉयलेट धुणारे खासदार पाहिले? जनसेवेची ही ऊर्मी आतूनच हवी…
हातमोजे न घालता खासदारांनी अशा पद्धतीने टॉयलेट धुतल्यामुळे अनेक जणांनी त्यांना ट्रोलही केलंय. कुणी त्यांची खिल्ली उडवली आहे. तर याउलट असंख्य लोकांनी सोशल मीडियावर खासदार मिश्रा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केलाय.
भोपाळः आम्ही लोकप्रतिनिधी.. लोकांची सेवा करण्यासाठी निवडून आलो आहोत. तुम्ही कधीही हाक मारा, मदतीला धावू असे म्हणणारे अनेक नेते पाहिलेत. निवडणुकांमध्ये आश्वासनं देतात आणि नंतर कर्तव्य विसरून जातात…. पण सध्या नेटकऱ्यांना असे एक लोकप्रतिनिधी सापडलेत. जे कर्तव्याप्रती प्रामाणिक असल्याचं दिसून येतंय. कारणही तसंच घडलंय. मध्य प्रदेशातले हे खासदार एका शाळेला भेट द्यायला गेले. तिथल्या शौचालयातली अस्वस्छता पाहिली. ही दुर्दशा त्यांना सहन झाली नाही…मग काय? आपला हात जगन्नाथ असं म्हणत त्यांनीच स्वच्छता मोहीम सुरु केली.
सोशल मीडियावर या भाजप खासदाराचा व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल होत आहे. या खासदाराचं नाव आहे जनार्दन मिश्रा.
मध्य प्रदेशातल्या रीवा मतदारसंघाचे खासदार. रीवा येथीलच एका मुलींच्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. त्यात मिश्रा यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी शाळेची पाहणी केली. येथील शौचालयाची दुर्दशा पाहून त्यांना रहावलं नाही. हातात ब्रश किंवा हातमोजे न घालताच त्यांनी सफाई करायला सुरुवात केली.
जनार्दन मिश्रा यांचा सफाई करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
#WATCH | Madhya Pradesh: BJP MP Janardan Mishra cleaned a dirty toilet at a school in Mauganj, Rewa district with his bare hands.
He says, “I was visiting the school and found the toilet to be dirty. So, I cleaned it. This is not a big deal.”
(Video Source: MP’s social media) pic.twitter.com/I4OElRHcXh
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) September 23, 2022
खासदारांना यावर विचारले असता ते म्हणाले, ‘ प्रत्येकानेच आपण जिथे राहतो, काम करतो, तेथील स्वच्छता केली पाहिजे. महात्मा गांधींपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही स्वच्छतेचा संदेश दिलाय…
लोकांना स्वच्छतेकडे प्रवृत्त करण्यासाठीच मी शाळेतलं शौचालय स्वच्छ केलं, असं जनार्दन मिश्रा यांनी सांगितलं.
हातमोजे न घालता खासदारांनी अशा पद्धतीने टॉयलेट धुतल्यामुळे अनेक जणांनी त्यांना ट्रोलही केलंय. कुणी त्यांची खिल्ली उडवली आहे. तर याउलट असंख्य लोकांनी सोशल मीडियावर खासदार मिश्रा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केलाय.