देव पण चूक करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझ्या पत्नीचे 19 बंगलो चोरीला गेले, कोर्लाईला जाताना सकाळी सकाळी सोमय्यांनी तोफ डागली

2020 आणि 2021 च्या पावत्या या रश्मी ठाकरे यांच्या नावाने देण्यात आल्या. मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती लपवली. पाच कोटी रुपये एप्रिल 2020 मध्ये भरलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवले नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेला घरं आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

देव पण चूक करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझ्या पत्नीचे 19 बंगलो चोरीला गेले, कोर्लाईला जाताना सकाळी सकाळी सोमय्यांनी तोफ डागली
किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 8:25 AM

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर 19 बंगल्यांवरुन तोफ डागणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अलिबागला रवाना झाले. सोमय्या आज रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावात जाणार आहेत. तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी करणार आहेत. देव पण चूक करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगावं माझ्या पत्नीचे 19 बंगलो चोरीला गेले, असं म्हणत कोर्लाईला जाताना सकाळी सकाळी सोमय्यांनी टीकास्त्र सोडलं. दरम्यान कोर्लाईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी मात्र किरीट सोमय्यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या जनतेला वास्तव समजून घ्यायचं आहे. ज्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतो, ज्या सरपंचाने मे 2019 महिन्याच्या सभेत, रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 ला अर्ज केला, जमीन माझ्या नावावर झाली, घरं माझ्या नावावर करा असं पत्र लिहिलं. मे 2019 मध्ये याच सरपंचानी तो प्रस्ताव मंजूर केला. ती घरे जून महिन्यात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावावर ती जमीन करण्यात आली. मी अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक संबंध समोर आणले त्यानंतर दुसऱ्या दिवशी कर भरला. अन्वय नाईक यांच्या नावानं कर भरला. ठाकरे परिवाराच्या बँक अकाऊंटमधून ग्रामपंचायतीसाठी असणारे सर्व टॅक्स भरण्यात आले. 2020 आणि 2021 च्या पावत्या या रश्मी ठाकरे यांच्या नावाने देण्यात आल्या. मात्र निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती लपवली. पाच कोटी रुपये एप्रिल 2020 मध्ये भरलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवले नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेला घरं आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

“माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले”

सप्टेंबर 2020 पासून मी पाठपुरावा करत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात जी कागदे दिली आहे त्याचा एकदाही उद्धव ठाकरे यांनी इन्कार केलेला नाही. महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला किरीट सोमय्याकडून अपेक्षा आहेत. आमचे कार्यकर्ते देखील तिथं येणार आहेत. आम्ही शक्तीप्रदर्शन करणार नाही, कार्यकर्त्यांना समजून घ्यायचं आहे. आम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. घरे आहेत की नाही ही वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे, ही घरे चोरीला गेली की वाहून गेली हे जनतेला जाणून घ्यायचे आहे. कोल्हापूर, अमरावती आणि पुण्यात दगड मारण्यात आला. पुण्यात तिथं हजारो नागरिकांनी सत्कार केला होता. आम्हाला अडवलं तरी कुणीही दंगल करणार नाही, प्रशासनानं अडवलं तरी पुन्हा त्यावेळी जाईन. मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो, अशी तोफ सोमय्यांनी डागली.

संबंधित बातम्या :

Rashmi Thackeray यांनी 19 बंगले नावावर करण्यासाठी पत्र लिहिल्याचा Kirit Somaiya यांचा दावा

VIDEO: ईडीनेही बोलावलं होतं म्हणून राऊतांना धास्ती; सोमय्यांनी वाचून दाखवलं रश्मी ठाकरेंचं ‘ते’ पत्र

सोमय्यांना पोलिसांची नोटीस, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन भेटावे, भुजबळांनी काय फोडला बॉम्बगोळा?

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.