अनिल देशमुखांकडे कोणतं गुपित, ज्यामुळे पवारांनी 24 तासांत भूमिका बदलली? भाजप आक्रमक

मुख्यमंत्री जर गृहमंत्री अनिल देशमुखांना वाचवत असतील तर ते योग्य नाही, असंही भाजप खासदार मनोज कोटक म्हणाले. (Manoj Kotak Sharad Pawar Anil Deshmukh)

अनिल देशमुखांकडे कोणतं गुपित, ज्यामुळे पवारांनी 24 तासांत भूमिका बदलली? भाजप आक्रमक
अनिल देशमुख, शरद पवार
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 2:06 PM

मुंबई : “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कालपर्यंत म्हणत होते की गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. आज पवार म्हणतात, की राजीनाम्याची गरज नाही. याचा अर्थ 24 तासांत अनिल देशमुख यांनी असं काय सांगितलं, त्यांच्याकडे असं काय गुपित आहे, की शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली?” असा सवाल भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक (BJP MP Manoj Kotak) यांनी विचारला आहे. (BJP MP Manoj Kotak asks why Sharad Pawar took u turn on Anil Deshmukh allegations)

“मुख्यमंत्री का गप्प आहेत?”

“गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 15 फेबुवारीला पत्रकार परिषद घेतली आणि त्याचे पुरावे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर उपलब्ध आहेत. या गोष्टीचा विपर्यास करण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर का बोलत नाहीत? कालपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते. आता मुख्यमंत्री का गप्प आहेत?” असा प्रश्नही कोटक यांनी विचारला आहे.

“गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी”

“याआधीच्या पोलिस महासंचालकांनी पत्र दिले होते की बदल्यामध्ये कसा भ्रष्टाचार होतो. आता माजी पोलीस आयुक्त वसुलीची माहिती पत्राद्वारे देतात. इथे तर थेट आरोप गृहमंत्र्यांवर आहेत. नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री जर त्यांना वाचवत असतील तर ते योग्य नाही” असंही मनोज कोटक म्हणाले. (BJP MP Manoj Kotak asks why Sharad Pawar took u turn on Anil Deshmukh allegations)

“ज्युलिओ रिबेरो चौकशी कशी करू शकतील?”

“अनिल देशमुख यांची चौकशी झाली पाहिजे. पण ही चौकशी केंद्रीय यंत्रणा किंवा न्यायाधीशामार्फत व्हावी. ज्युलिओ रिबेरो हे माजी पोलीस अधिकारी आहेत, ते पोलीस दलात होते. ते गृहमंत्र्यांची चौकशी कशी करू शकतील?” असा प्रतिप्रश्न मनोज कोटक यांनी विचारला.

संबंधित बातम्या :

मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल, राजधानीत शरद पवारांचा हुंकार

अनिल देशमुख यांना शरद पवारांचा खंबीर पाठिंबा, 5 मोठे मुद्दे

मग हे अनिल देशमुख कोण?; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल

(BJP MP Manoj Kotak asks why Sharad Pawar took u turn on Anil Deshmukh allegations)

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.