Piyush Goyal : महाराष्ट्रात 5 जण तरी ओळखतात का, बोचऱ्या टीकेचा सामना करणारे खासदार पियूष गोयल कोण आहेत?

पियूष गोयल यांच्या घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. पियूष गोयल यांची आई चंद्रकांता गोयल आणि वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. | Who is Piyush Goyal

Piyush Goyal : महाराष्ट्रात 5 जण तरी ओळखतात का, बोचऱ्या टीकेचा सामना करणारे खासदार पियूष गोयल कोण आहेत?
Piyush Goyal
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 3:48 PM

मुंबई: ठाकरे सरकारने निर्लज्ज राजकारण थांबवावे, असे टीकास्त्र सोडणारे खासदार पियूष गोयल हे सध्या पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात एक्स्प्रेस गाड्यांच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्या रेल्वे खात्याला अनेकदा लक्ष्य केले होते. तेव्हा संजय राऊत आणि पियूष गोयल यांचा सोशल मीडियावरील सामना चांगलाच रंगला होता. (Who is BJP MP Piyush Goyal)

मात्र, आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील भाजप खासदार या नात्याने त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या टीकेला महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जशास तसे प्रत्युत्तरही देण्यात आले होते. त्यामुळे सध्या पियूष गोयल चर्चेत आहेत. पियूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या खास मर्जीतील नेते म्हणून ओळखले जातात. मोदी-शाह जोडगोळीकडून पियूष गोयल यांच्याकडे रेल्वे आणि वाणिज्य मंत्रालयासारखी महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात पियूष गोयल हे नाव नेहमीची चर्चेत असते.

पियूष गोयल यांचे बालपण आणि शिक्षण

पियूष गोयल यांचा जन्म 13 जून 1964 रोजी मुंबईत झाला. माटुंग्याच्या डॉन बॉस्को शाळेत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर पियूष गोयल यांनी सीए आणि कायद्याचे शिक्षण घेतले. सीएच्या परीक्षेत देशातून दुसरा क्रमांक पटकावण्याची कामगिरी पियूष गोयल यांनी करुन दाखविली होती. तर विधी शाखेच्या परीक्षेतही त्यांनी मुंबईतून दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर पियूष गोयल यांनी येल, ऑक्सफर्ड आणि प्रिन्स्टन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठांमध्येही त्यांनी काही काळ अध्ययन केले. पियूष गोयल यांचा विवाह सीमा गोयल यांच्याशी झाला असून या दाम्पत्याला दोन मुले आहेत.

पियूष गोयल यांनी काही काळ भारतातील बड्या बँकांच्या संचालक मंडळावर काम केले आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या वित्तविषयक आणि संरक्षण समितीचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याशिवाय, इंडियन मर्चंट चेंबर्सच्या व्यवस्थापकीय जबाबदाऱ्यांचाही त्यांना अनुभव आहे.

पियूष गोयल यांची राजकीय पार्श्वभूमी

पियूष गोयल यांच्या घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला. पियूष गोयल यांची आई चंद्रकांता गोयल आणि वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. चंद्रकांता गोयल या तीनवेळा महाराष्ट्रातील विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. तर वेदप्रकाश गोयल हे भाजपच्या जुन्या फळीतील नेते. त्यांनी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रात मंत्रिपद भूषविले होते. मात्र, भाजपचे खजिनदार ही त्यांची मुख्य जबाबदारी होती. तब्बल दोन दशके वेदप्रकाश गोयल यांनी ही जबाबदारी सांभाळली.

त्यामुळे भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळात सुरुवातीपासूनच पियूष गोयल यांना सहज प्रवेश होता. वडिलांनंतर पियूष गोयल यांनीही भाजपचे खजिनदार म्हणून काही काळ काम केले. पक्षाचे खजिनदार म्हणून तिजोरी भरभक्कम राहील हे बघण्याचे काम त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडले.

2014 च्या निवडणुकीत मोदी यांच्या प्रचाराचे व्यवस्थापन करणाऱ्या नेत्यांमध्ये गोयल यांचा समावेश होता. त्यामुळे मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मुंबईतून लोकसभेवर निवडून आलेल्या एकालाही संधी देण्यात आलेली नसली तरी गोयल यांच्या रुपाने पक्षाने मंत्रिमंडळात मुंबईला प्रतिनिधीत्व दिले आहे. राज्यातून पक्षाने त्यांना मागेच राज्यसभेवर पाठवले होते.

पियूष गोयल यांची राजकीय कारकीर्द

पियषू गोयल हे 2010 साली भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेले. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्याकडे आणि कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला. तर 3 डिसेंबर 2017 मध्ये तत्कालीन मंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिल्यानंतर रेल्वे खात्याचा कारभारही पियूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आला. रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली. यानंतर भाजपचे दिवंगत नेते अरूण जेटली यांच्या आजारपणाच्या काळात पियूष गोयल यांनी अर्थखात्याची जबाबदारीही सांभाळली होती.

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही पियूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आणि कोळसा मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. याशिवाय, ते वाणिज्य खात्याचा कारभारही सांभाळतात. पियूष गोयल हे केवळ मोदी आणि शाह यांच्या विश्वासातीलच नव्हे तर चांगली कामगिरी करणाऱ्या केंद्रीय नेत्यांपैकी एक आहेत.

‘पीयूष गोयल महाराष्ट्राचा अपमान करतायत, राज्यात तुम्हाला 5 लोकं तरी ओळखत असतील का?’

उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण करणे थांबवावे, अशी खरमरीत टीका करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्यावर महाविकास आघाडीकडून पलटवार करण्यात आला आहे. पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केलेली टीका चुकीची आहे. गोयल यांना महाराष्ट्रात 5 लोकं तरी ओळखतात का, असा खोचक सवाल महाविकासआघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी विचारला.

(BJP MP Piyush Goyal prominent leader in Modi cabinet Who is Piyush Goyal)

मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....