खासदार रक्षा खडसेंचा निर्धार, 9 तारखेला ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

इतर जिल्ह्यातील मंत्री पॅकेज घोषित करतात, मग जळगावात का नाही? असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला

खासदार रक्षा खडसेंचा निर्धार, 9 तारखेला ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 11:54 AM

जळगाव : रावेरमधील भाजप खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) येत्या 9 तारखेला ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Government) रस्त्यावर उतरणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणास्तव रक्षा खडसे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यलयासमोर त्या मोठं आंदोलन करणार आहेत. (BJP MP Raksha Khadse to protest against Thackeray Government in Jalgaon)

भाजपचे सर्व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी, केळी उत्पादक 2019 या वर्षातील बँकांच्या चुकांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत कोणत्याही प्रकारची आढावा बैठक घेण्यात आलेली नाही, असा दावा केला जात आहे.

महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे बोलते, परंतु महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरली, तरी राज्य शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी जळगाव भाजपतर्फे रक्षा खडसे 9 नोव्हेंबरला आंदोलन करणार आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून मागणी करुनही राज्य सरकार लक्ष देत नाही. इतर जिल्ह्यातील मंत्री हे त्या ठिकाणी जाऊन पॅकेज घोषित करत आहेत, मग जळगावात का नाही? असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला.ट

हेही वाचा : जळगावात भाजपची बैठक, एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे गैरहजर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रक्षा खडसे यांचे सासरे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. पक्षबदलानंतर खडसेंच्या पदरी नेमकं काय पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून खडसे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

फाशी घेण्याची वेळ आली होती… : एकनाथ खडसे

‘मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं मला एका माणसाने छळलं.’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला होता. (BJP MP Raksha Khadse to protest against Thackeray Government in Jalgaon)

मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रिपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लिहिणार केंद्राला पत्र

(BJP MP Raksha Khadse to protest against Thackeray Government in Jalgaon)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.