उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा, भाजप खा. रणजित निंबाळकर म्हणतात आम्ही आधीपासूनच एकत्र

भाजप खासदार रणजित नाईक-निंबाळकर यांच्यावर उदयनराजेंनी कौतुकाचा वर्षाव केला. तर रणजित निंबाळकरांनीही आपण आधीपासून एकत्र असल्याचं सांगत उदयनराजेंच्या संभाव्य भाजपप्रवेशावरील प्रश्नचिन्ह कायम ठेवलं

उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा, भाजप खा. रणजित निंबाळकर म्हणतात आम्ही आधीपासूनच एकत्र
Follow us
| Updated on: Aug 23, 2019 | 10:44 AM

सातारा : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संभाव्य भाजपप्रवेशाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. भाजप प्रवेशाचं काही माहिती नाही, असं सांगतानाच भाजप खासदार रणजित नाईक-निंबाळकर (Ranjit Naik Nimbalkar) यांच्यावर उदयनराजेंनी कौतुकाचा वर्षाव केला. तर रणजित निंबाळकरांनीही आपण आधीपासून एकत्र असल्याचं सांगत सर्वांना बुचकळ्यात टाकलं

भाजप प्रवेशाचं काही माहिती नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, असं मोघम उत्तर उदयनराजेंनी दिल्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबतचं प्रश्नचि‌न्ह कायम आहे. फलटणमध्ये एका खाजगी दौऱ्यावेळी उदयनराजे आणि रणजित निंबाळकर पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजित निंबाळकर हे माढ्यातून खासदार आहेत.

खा. रणजित नाईक-निंबाळकर हा माझा मित्र खासदार झाल्याचा आनंद आहे, असंही उदयनराजे म्हणाले. आपलं राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न विचारला असता ‘आम्ही आधीपासूनच बरोबर आहोत’, असं सूचक उत्तर रणजित निंबाळकरांनी उत्स्फूर्तपणे दिलं. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षांतराचं गूढ अधिकच वाढलं.

“संघर्षातून उभी राहिलेले लोक कधी कोणापुढे झुकत नसतात. ती लोकांसाठी कायम झटत असतात. त्यापैकी मी आणि रणजित आहोत” असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

भाजपने छत्रपतींच्या घराण्यातील वारसदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे काहीच काळापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांचे धाकटे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle) यांनीही उदयनराजेंच्या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं आहे.

उदयनराजेंचं प्रस्थ

छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांचं साताऱ्यात मोठं प्रस्थ आहे. साताऱ्यातून सलग तिसऱ्यांदा उदयनराजे खासदारपदी निवडून आले आहेत. 2014 मध्ये ‘मोदी लाट’ असतानाही उदयनराजेंनी आपली सीट टिकवली होती. त्याचीच पुनरावृत्ती 2019 मध्येही घडली. उदयनराजे पक्षाच्या नावावर नाही, तर स्वकर्तृत्वावर जिंकून येतात, असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करतात. यापूर्वी 1998 मध्ये ते आमदारपदीही निवडून आले होते. त्यामुळे उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास पक्षाचा आणखी एक गड खालसा होईल.

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादीचे केवळ चारच खासदार निवडून आले आहेत. सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, सुनिल तटकरे आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यापैकी एका खासदाराने पक्षाला रामराम ठोकल्यास राष्ट्रवादीला मोठा हादरा बसेल.

दुसरीकडे, शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) भाजपचा झेंडा हाती धरण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र दोघांमध्ये असलेल्या मतभेदांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना तोडगा काढता न आल्याने रामराजे निंबाळकर गेल्या काही काळापासून नाराज आहेत. आता दोन्ही तलवारी पुन्हा एकाच म्यानात आल्या, तर काय होईल, हे सांगता येणार नाही.

संबंधित बातम्या
उदयनराजे थोरले बंधू, विधानसभेला मला मदत करणार : शिवेंद्रराजे
..तर रामराजेंची जीभ हासडली असती, पवारांसोबतच्या बैठकीतून बाहेर येताच उदयनराजे आक्रमक
आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना
“माझा डीएनए तपासा, 96 पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद”
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.