काँग्रेस उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलेल्या खासदाराला तिकीट कापण्याची भीती
लखनौ : देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशात भाजप अनेक खासदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. तिकीट कापण्याच्या भीतीने उन्नावचे विद्यमान खासदार साक्षी महाराज यांनी पक्षाला जातीय समीकरण समजावून सांगितलंय. शिवाय तिकीट न मिळाल्यास परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकीही दिली आहे. त्यांनी याबाबत उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांना पत्र लिहिलंय. उन्नावमध्ये माझ्याव्यतिरिक्त कुणीही […]
लखनौ : देशातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशात भाजप अनेक खासदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. तिकीट कापण्याच्या भीतीने उन्नावचे विद्यमान खासदार साक्षी महाराज यांनी पक्षाला जातीय समीकरण समजावून सांगितलंय. शिवाय तिकीट न मिळाल्यास परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकीही दिली आहे. त्यांनी याबाबत उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांना पत्र लिहिलंय.
उन्नावमध्ये माझ्याव्यतिरिक्त कुणीही ओबीसीचं प्रतिनिधित्व करत नाही. नेहमीच पक्षावर ओबीसींची उपेक्षा केल्याचा आरोप होतो. त्यामुळे मला तिकीट न मिळाल्यास हा आरोप सिद्ध होईल, अशी भीतीही साक्षी महाराजांनी पक्षाला दाखवली आहे.
जिल्ह्यातील झेडपी अध्यक्ष ठाकूर, दोन आमदारही ठाकूर, एक विधानपरिषद आमदार ठाकूर, तर एक ब्राह्मण, विधानसभा अध्यक्ष ब्राह्मण, एक आमदार वैश्य, एक आमदार धोबी समाजाचा आहे. मला पक्षाने तिकीट न दिल्यास उत्तर प्रदेशातील हजारो कार्यकर्ते नाराज होतील, ज्याचे परिणाम चांगले नसतील, असं म्हणत त्यांनी पक्षाला धमकीही देऊन टाकली.
साक्षी महाराज यांनी पत्रात लिहिलंय, की “मी 2014 ला 3 लाख 15 हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती. लोकसभेला काँग्रेस आणि बसपाचं डिपॉझिट जप्त केलं होतं. तर सपा दुसऱ्या क्रमांकावर होती. यावेळी सपा आणि बसपा यांच्या युतीमध्ये ही जागा सपाच्या वाट्याला आली आहे. सपाकडून अरुण कुमार शुक्ला किंवा ब्राह्मण उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.”