बंगाली राजकारण : भाजप खासदाराची पत्नी TMC मध्ये गेली, खासदारानं तलाकची नोटीस दिली

West Bengal Election 2021 : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत.

बंगाली राजकारण : भाजप खासदाराची पत्नी TMC मध्ये गेली, खासदारानं तलाकची नोटीस दिली
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 5:09 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. पश्चिम बंगालचे भाजप खासदार सौमित्र खान (Saumitra Khan)  यांची पत्नी सुजाता मोंडल (Sujata Mondal) यांनी थेट ममता बॅनर्जींच्या ( Mamata Banerjee) तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. या प्रकाराने संतापलेल्या भाजप खासदार सौमित्र खान यांनी थेट तलाक नोटीस पाठवण्याचा निर्धार केला आहे. इतकंच नाही तर खान हे आडनाव वापरु नको, असा दमही सौमित्र यांनी पत्नी सुजाताला दिला आहे. (BJP MP soumitra khan to sent talaq notice to wife after join TMC Bengal election)

काय आहे प्रकरण?

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसाच्या दौऱ्यात संपूर्ण पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून काढले आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे खासदार, आमदार आणि नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन शहा यांनी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे. मात्र, शहा यांचा दौरा आटोपताच भाजप खासदाराच्या पत्नीने टीएमसीत प्रवेश केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर पत्नीच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या खासदाराने थेट पत्नीलाच तलाक देण्याची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Bengal election 2021: BJP MP Saumitra Khan’s wife Sujata Khan joins tmc)

पत्नीचा आरोप

मी अनुसूचित जमातीतून येणारी दलित महिला आहे. मला राजकारणात भाजपसह पतीशीही लढाई लढावी लागली आहे. भाजपमध्ये केवळ संधीसाधूंनाच संधी दिली जात आहे. त्यामुळेच मी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असं सुजाता यांनी सांगितलं. भाजप केवळ 2 ते 18 जागा जिंकू शकतो हे माहीत होतं, तेव्हापासून आम्ही भाजपसाठी प्रचार करतोय. त्यावेळी आम्हाला कोणतंही संरक्षण नव्हतं आणि कोणताही बॅकअप नव्हता. आम्ही जनतेसाठी लढलो आणि जिंकलोही. भाजपमध्ये मला कोणताच मान सन्मान दिला गेला नाही, त्यामुळेच मी अजूनही एक लढाई लढतेय, असं मला वाटत आहे, असंही त्या म्हणाल्या.

भाजपच्या विजयात हात

सुजाता यांचा भाजपच्या पश्चिम बंगालमधील विजयात मोठा हात आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत बांकुरा येथील निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. सुजाता यांच्या आक्रमक प्रचाराची आणि संघटन कौशल्याची तृणमूल काँग्रेसने धास्ती घेतली होती. त्यामुळेच संपूर्ण निवडणूक पार पडेपर्यंत सुजाता यांना बांकुरा येथे प्रचारास येण्यापासून मनाई करण्यात आली होती. (Bengal election 2021: BJP MP Saumitra Khan’s wife Sujata Khan joins tmc)

(BJP MP soumitra khan to sent talaq notice to wife after join TMC Bengal election)

संबंधित बातम्या 

शहांचा दौरा आटोपला अन् भाजप खासदाराची बायको टीएमसीत

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.